prabodhini news logo
Home आर्थिक टेकरी येथील कर्करोगग्रस्तांना आ. विजय वडेट्टीवारांकडून आर्थिक मदत

टेकरी येथील कर्करोगग्रस्तांना आ. विजय वडेट्टीवारांकडून आर्थिक मदत

0
121

कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर

सिंदेवाही तालुक्यातील टेकरी येथील कुंदा उमाजी नन्नावरे, होमराज वाकडे, मीनाक्षी प्रमोद सूर्यवंशी आदींना कर्करोग या जीवघेण्या आजाराने ग्रासले आहे. या तिन्ही कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने कर्करोगग्रस्त कुटुंबीयांना पुढील उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याचे सिंदेवाही तालुक्यातील टेकरी येथील विमुक्त भटक्या जाती -जमाती आघाडीचे तालुकाध्य्क्ष महेश मंडलवार यांच्या लक्षात येताच त्यांनी कुठलाही उशीर न करता काँग्रेस कमेटीचे सिंदेवाही अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. रमाकांत लोधे यांच्या लक्षात आणून दिले. त्यांनी तातडीने आमदार विजय वडेट्टीवार यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली असता पुढील उपचारासाठी आर्थिक मदत पाठवून उपचार सुरू ठेवण्याचे त्यांना सांगितले.

मदत देते वेळी महेश मंडलवार, विजय नैताम, वनिता शेरकुरे, यशवंत सूर्यवंशी, पुरुषोत्तम ढोणे, मधुकर सूर्यवंशी, पप्पू पारसरामे, दौलत गायकवाड, साईनाथ सहारे, रामू गायकवाड आदीची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here