prabodhini news logo
Home आर्थिक रामाळा येथील कॅन्सर ग्रस्तास विरोधी पक्ष नेते आ.विजय वड़ेट्टीवार यांच्या कडून आर्थिक...

रामाळा येथील कॅन्सर ग्रस्तास विरोधी पक्ष नेते आ.विजय वड़ेट्टीवार यांच्या कडून आर्थिक मदत

0
172

कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर

सिंदेवाही तालुक्यातील रामाळा येथील श्री. अनंत वसंत निकोड़े हे बरेच दिवसापासून कर्करोगाने ग्रस्त होते. त्यांची आर्थिक परिस्थिति अत्यंत हालाखीची असून त्यांना पुढील उपचारा साठी मदतीची गरज होती. ही बाब रामाळा येथील तालुका युवक कांग्रेस कमिटी चे उपाध्यक्ष अक्षय पेटकुले यांच्या लक्षात येताच ,त्यांनी श्री. रमाकांत लोधे अध्यक्ष तालुका कांग्रेस कमिटी सिंदेवाही यांना माहिती दिली आणि लगेच श्री.अनंत वसंत निकोड़े यांना विरोधी पक्ष नेते, आ .विजय वड्डेटीवार यांच्या कडून आर्थिक मदत करण्यात आली.
मदत देते वेळी रामाळा गांवचे सरपंच अरविंद मेश्राम, गणेशजी मोहुर्ले, तालुका युवक कांग्रेस उपाध्यक्ष श्री.अक्षय पेटकुले,गुरुदेव सेवा मंडळचे अध्यक्ष सुरेशजी कामड़ी, देवरावजी बावने हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here