prabodhini news logo
Home चंद्रपूर संविधान जागर उपक्रम पंचायत समिती ब्रम्हपुरी येथे संपन्न

संविधान जागर उपक्रम पंचायत समिती ब्रम्हपुरी येथे संपन्न

0
110

रविंद्र मैंद तालुका प्रतिनिधी, ब्रम्हपुरी :- भारतीय संविधान हे जगातील सर्वोत्तम संविधान असून त्याचे महत्व जनमाणसांपर्यत पोहोचविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक सहायक संस्थेच्या वतीने पंचायत समिती ब्रम्हपुरी आज संविधान जागर उपक्रम राबविण्यात आला.

संविधान जागर उपक्रमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक सहाय्यक संस्था चंद्रपूर चे मुख्य प्रवर्तक अशोक घोटेकर, पंचायत समिती ब्रह्मपुरी चे बिडीओ घुबडे, मिलिंद कुरसुंगे, जे. के राऊत विभागीय अभियंता, आर जी येरमे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक सहायक संस्था चंद्रपूर च्या माध्यमातून जिल्ह्यात एक हजार ठिकाणी संविधान जागर उपक्रम राबविण्याचा मानस असून आज दिनांक 18 जुलै 2024 रोजी ब्रह्मपुरी पंचायत समिती 160 वा संविधान जागर उपक्रम पंचायत समिती ब्रह्मपुरी बिडीओ घुबडे, यांच्या अध्यक्षतेत राबविण्यात आला.

सदर उपक्रमात अशोक घोटेकर यांनी उपस्थित सर्व पंचायत समिती व पदाधिकाऱ्यांना संविधान प्रास्ताविकेची प्रत वितरित करीत प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले तसेच संविधान जागर उपक्रमाचे महत्व विषद केले.

संविधानाची निर्मिती व संविधानाचे महत्व यावर कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक इंजि शेषराव सहारे, शंकर वेल्हेकर यांनी महत्वाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम. एस. घुले यांनी केले.
यावेळी पंचायत समिती चे सर्व पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here