रक्तविर सेनेने केली जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार.
रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज
ब्रम्हपुरी :- महाराष्ट्रातील सर्वात मोठे पांढऱ्या सोन्याची खान, म्हणजेच रेतीचे घाट चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात आहेत.
नदीपात्राच्या किनाऱ्यावर असलेला हा तालुका रेती तस्करीच्या बाबतीमध्ये मागे नाही. प्रशासन कायदेशीर रित्या घाटाची लिलाव करते. पण बेकायदेशीर पणाने रेती घाटाचे तीत्तर-बित्तर करण्यात रेती तस्करी करणाऱ्यांचे मोठे योगदान असते.
अशात रेतीची बेकायदेशीर तस्करी व महसूल अधिकारी यांना धक्काबुक्की, शिवीगाळ करणाऱ्यांवर पोलीस ठाणे वाठोडा गु.र.क्र. १०/२०२४ अंतर्गत ब्रह्मपुरी तालुक्यातील कु वाळू तस्कर किशोर बालपांडे याला अटक करण्यात आली.
परंतु, रेती ही खिशामध्ये भरून नेण्यासारखी वस्तू नाही, बलाढ्य ट्रॅक्टर व ट्रकने वाहतूक करून, विविध जिल्ह्यात रेती तस्करी करणे. हे एकट्या कुख्यात वाळू तस्कर किशोर बालपांडेचे काम नाही.
कुख्यात रेती तस्कर बालपांडे जेव्हा अवैद्य रेती उत्खनन करून, खुलेआम रेती तस्करी करत होता. तर स्थानिक ब्रह्मपुरी तहसीलदार,उपविभागीय अधिकारी व इतर महसूल अधिकारी काय करत होते.?
वर्षानुवर्ष रेती तस्करी करून, प्रशासनाला चुना लावणाऱ्या रेती तस्कर बालपांडेला अटक झाली.
मात्र त्याला साथ देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी कधी होणार व त्यांच्या हातात कधी पडणार..?
त्या रेती तस्करीत कुख्यात किशोर बालपांडे व तहसीलदार यांचे काय संबंध याची चौकशी करून, व या प्रकरणात जे कोणी महसूल अधिकारी असतील त्यांची कठोर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
रेती तस्करी संबंधित जनतेच्या समस्येला वाचा फोडण्यासाठी रक्तवीर सेनेचे अध्यक्ष निहाल ढोरे व उपाध्यक्ष मायासिंग बावरी यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना तक्रार व जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, महसूल मंत्री, नागपूर विभागीय आयुक्त, नागपूर पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांना तक्रार दिली.

