मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – मुंबई – दि.२२ जुलै २०२४:- राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध प्रकारच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची समायोजन बाबत दिशाभूल करणारी, नियमीत कर्मचारी व आरोग्य अभियान मधील कर्मचारी यांचे मध्ये भांडणे लावणारे वातावरण तयार करुन स्वताला नियमित कर्मचारी आहे. मीच तारणहार, हितचिंतक असल्याचा दाखविण्याचा प्रयत्न आरोग्य अभियान मधील काही समन्वयक असलेले कर्मचारी करित आहेत.समायोजन हे सरळ सेवेच्याच पदावर होवु शकते. .आरोग्य पर्यवेक्षक चे ७५ टक्के पदे पदोन्नती करीता राखीव आहे.त्या ठिकाणी समायोजन होणार नाही.२५ पदे सरळ सेवे करीता राखीव आहेत.त्या पदाची शैक्षणिक पात्रता आरोग्य अभियान चे कर्मचारी यांचेकडे असेल तर २५ टक्के पदापैकी ३० टक्के समायोजन होणार.आरोग्य सेवीका व सेवक या पदावर ३० टक्के समायोजन हे आरोग्य अभियान मधील कर्मचारी यांचे होणार आहे . मात्र समायोजन करित असताना परिक्षकांची गरज नाही सरळ सेवेने आणि अनुभवी असलेल्या आरोग्य सेविकांना सरसकटपणे शासकीय सेवेत सामावून घेणे गरजेचे होते. परंतु शासनाने निधी गोळा करण्यासाठी समन्वयकांचा आधार घेऊन प्रत्येक उमेदवारांकडून सत्तर हजार रुपये जमा करण्यात यावे असे आदेश समन्वयक असलेल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून फर्माविण्यात आल्याची चर्चा आहे.
नियुक्त कर्मचारी हे आरोग्य अभियान मधील नसेल तर दुसरें कोणी असणार.
२००५ पासून कार्यरत असलेले राष्ट्रिय आरोग्य आरोग्य अभियानांतर्गत काम कर्मचारी जे आपल्या नियमीत कर्मचारी यांचे सोबत काम करित आहेत.त्यांचे समायोजन होत असेल तर कुणाला पोट दुखण्याचे कारण नाही.
कर्मचारी यांनी अध्यक्ष घोषित केले नाही .स्वताला स्वताच अध्यक्ष घोषित करुन घेतले. आरोग्य सेवक/ सेवीका यांचे मंजूर पदावर पद भरती झाल्यास त्यांना ३० टक्के कोणती पदे राहणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर मंत्रालय आणि महाराष्ट्रातील अनेक लोकप्रतिनिधी , आमदार खासदार आणि मंत्र्यांना समायोजन संदर्भात देण्यात आलेले पत्र दखल घेण्या सारखे होते. प्रथम सेवा प्रवेश नियम, पदोन्नती धोरण, शुन्य जेष्ठता, समायोजन, मंजूर पदें, अंतर्गत कोठा याचा अभ्यास कराण्याची गरज आहे. आरोग्य अभियान मधील कर्मचारी यांना घाबरण्याचे कारण नाही. गडचिरोली जिल्ह्यातील पोरला, वडधा , आणि पोटेगांव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या काही समन्वयक असलेल्या कर्मचाऱ्यांनी सत्तर….सत्तर हजार रुपये जमा करून नागपूरातील भाजपच्या बड्या नेत्यांच्या बंगल्यात जाऊन जमा करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. आणि तेही पैसे टप्प्या .. टप्प्याने जमा करण्यात आले आहे.

