109 विद्यार्थी, पालक व शिक्षकांचा सत्कार
उषा नाईक जिल्हा संपादक वाशीम – कारंजा – महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ कारंजा व स्व. आशादेवी चव्हाण बहुद्देशीय संस्था यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने २० जुलै रोजी स्थानिक महेश भवन येथे गुणवंतांचा गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला अध्यक्ष कारंजा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने, स्वागताध्यक्ष म्हणून स्वर्गीय आशादेवी चव्हाण बहुउद्देशीय संस्था यवतमाळ या संस्थेचे सचिव डॉ. महेश चव्हाण व डॉ. निकिता चव्हाण, प्रमुख व्यवसाय मार्गदर्शन मेडिया ट्रेनर आशिष वानखेडे तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे मंत्रालयिन सचिव अमोलभाऊ पाटणकर, कारंजाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमित शिंदे, शेतकऱ्याचे प्रमुख मार्गदर्शक गजाननभाऊ अमदाबादकर, सर्वधर्म आपत्कालीन संस्थेचे प्रमुख श्याम रामदास सवाई, नगर परिषद कारंजाचे गटनेते एड. फिरोज शेकुवाले,महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष बंडूभाऊ इंगोले आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
याप्रसंगी सर्व प्रथम दहावी बारावी नंतरचे विश्व याबाबत मीडिया ट्रेनर आशिष वानखेडे यांनी मार्गदर्शन केले. मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष डॉक्टर महेश चव्हाण व डॉ.निकिता चव्हाण यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
इयत्ता दहावी व बारावी मध्ये कारंजा तालुक्यातील प्रत्येक शाळेतून प्रथम आलेल्या, क्रीडा स्पर्धा व विविध स्पर्धा परीक्षेत नेत्रदीपक यश प्राप्त करणाऱ्या 109 गुणवंत विद्यार्थ्यांचा, त्यांच्या पालकांचा तसेच त्यांच्या मुख्याध्यापक व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात जिल्हास्तर व तालुकास्तरावर विजेत्या शाळेतील 08 मुख्याध्यापक व शिक्षकांचा तसेच कारंजा तालुक्यातील शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी मेहनत करणारे विजयकुमार रौराळे, युवा आयकॉन एड. फिरोज शेकूवाले, डॉ. मोहम्मद हाजी फारूक पोपटे, योगेश यादव आदीचा सत्कार करण्यात आला. बाबासाहेब धाबेकर विद्यालय यावर्डीच्या आठ मुलींनी राज्यस्तरावर मिनी गोल्फ स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा जिल्ह्यातील प्रथम आलेली कु. पूर्वी संतोष डहाके, एन एम एम परीक्षेत शिष्यवृत्ती साठी पात्र ठरलेले नरसिंह विद्यालय धामणी येथील कु.कांचन राठोड व कृष्णा पुसांडे, होमीभाभा परीक्षेत गोल्ड मेडल मिळणाऱ्या आर जे चवरे शाळेचा अथर्व सुनील ठाकरे आदी विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
जिल्हाध्यक्ष बंडूभाऊ इंगोले जिल्हा उपाध्यक्ष विजय भड जिल्हा सचिव सागर अंभोरे, सल्लागार सुधाकर गर्जे तालुकाध्यक्ष आरिफ पोपटे, उपाध्यक्ष रामदास मिसाळ, प्रा दिनेश रघुवंशी, तालुका सचिव महेंद्र गुप्ता, निलेश मुंदे, दामोदर जोंधळेकर, पवन गुप्ता, रवींद्र इंगळे, कु.मयुरी गुप्ता, उषा नाईक, मोनाली गणवीर, श्रवण किन्हीकर, डॉ.गुणवंत राठोड, रमेश देशमुख, विजय खंडार, अजय काकडे, राजेश श्यामसुंदर,रमेश चंदनशिवे, गजानन टोम्पे दीपक इंगळे ज्ञानेश्वर वरघट, महादेव जाधव संदीप कुऱ्हे, सलीम खान कालूभाऊ तवंगर, विनोदकुमार गनवीर, आशिष धोंडगे, विजय खंडार,विलास खपली, पवनकुमार कदम, धनंजय राठोड, मंगेश बाबरे,वसंतराव मारोटकर यांच्यासह महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे इतर सदस्य यानी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम केले.
या कार्यक्रमाचे प्रस्तावित बंडूभाऊ इंगोले यांनी केले तर सूत्रसंचालन हेमंत पापडे यांनी केले तर आभार प्रदर्शन विजय भड यांनी केले.
या कार्यक्रमाने बहुसंख्य गुनवंताची उपस्थिती होती.

