prabodhini news logo
Home चंद्रपूर भद्रावती तालुक्याला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 50 हजार हेक्टरी नुकसान भरपाई द्या – आप...

भद्रावती तालुक्याला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 50 हजार हेक्टरी नुकसान भरपाई द्या – आप युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक

0
180

तहसीलदार यांना आप व कि. यु. शे. संघटने तर्फे निवेदन सादर.

भद्रावती प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक भाग हा जलमय झाला आहे. नदी, नाल्यांना पुराचा स्वरूप घेतला असून तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीमध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे. शेतात असलेल्या पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी अधिक चिंताग्रस्त झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे पेरणी करून नामांकित कंपनीचे बियाणे बोगस ठरले असून वापिला आले नाहीत. शेतकऱ्यांवर आधीच दुबार पेरणीचे संकट आले असून यात अनेक शेतकऱ्यांना कर्जबाजारी होऊन पेरणी करावी लागली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहेत. सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पुराची परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले आहे ज्यात सोयाबीन, तूर, कापूस, धान यासारख्या पिकांची मातीसह रोपटे वाहून गेले आहे. ज्या प्रमाणे दिल्ली व पंजाब मधे आम आदमी पार्टी ची सरकार 50 हजार रुपये हेक्टरी प्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येते, त्याच प्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा देण्यात यावी. तत्काळ भद्रावती तालुका हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा व प्रत्येकी 50 हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई देण्यात यावी आशी मागणी आम आदमी पार्टी चे युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक यांनी तहसीलदार साहेब यांना निवेदना द्वारे केली आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष तथा वरोरा – भद्रावती विधानसभा अध्यक्ष सुरज शहा, युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक, शहर अध्यक्ष अनिल कुमार राम, रोहन गाज्जेवार, शेतकरी नेते सुरज खंगार, शेतकरी नेते रवींद्र गेजिक, पवन ढोके, रोशन मानकर व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here