
वाढदिवस कार्यक्रमात ६५ किलोचे ‘लाडू’ वाटून वाढवला ‘गोडवा’: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्तुत्य उपक्रम, आ. भावना गवळी यांचा ही केला सत्कार
उषा नाईक जिल्हा संपादक वाशीम कारंजा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांचा ६५ वा वाढदिवस सोमवार दि. २२ जुलै रोजी मोठ्या उत्साहात व हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ६५ व्या वाढदिवसानिमित्त ६५ किलो पेढे वाटून तसेच कष्टकरी शेतकऱ्यांना रेनकोड,छत्री, ब्लँकेटसह भेट वस्तूंचे वाटप करून वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला तसेच माजी खासदार तसेच नवनिर्वाचित आमदार भावना गवळी यांचा ही सत्कार करण्यात आला.
आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष हाजी मो. युसुफ पुंजानी हे होते तर सत्कारमूर्ती म्हणून माजी खासदार तसेच नवनिर्वाचित आमदार भावनाताई गवळी तर प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके, माजी जि.प.अध्यक्ष दिलीप जाधव, माजी जि.प सभापती जयकीसन राठोड, ओबीसी सेलचे विदर्भ प्रभारी राजू गुल्हाणे, रायुकॉ प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत गोळे, राकापा महिला जिल्हाध्यक्ष माधवीताई झनक, माजी जि.प. सदस्य मोहन महाराज, जि.प. सभापती अशोक डोंगरदिवे, जि.प.सदस्य प्रमोद पाटील लळे,जि.प.सदस्य चंद्रकांत डोईफोडे, पंचायत समितीचे सभापती प्रदीप देशमुख, दत्तात्रय झनक, तालुकाध्यक्ष अमोल ठाकरे, शहराध्यक्ष अजय श्रीवास, माजी गटनेते ॲड. फिरोज शेकुवाले, अल्पसंख्याक जिल्हा कार्याध्यक्ष जाकीर शेख, नगरसेवक सलीम गारवे, सलीम प्यारेवाले, प्रसन्ना पळसकर, नदीम राज, ॲड. सुभान खेतीवाले, अ.एजाज, शेख युनूस, जावेदोद्दीन, अ.रशीद, जिल्हा कार्यकारिणी सदस्य फारूक अली, मानोरा तालुकाध्यक्ष राजेश नेमाने,चंद्रकांत राठोड, प्रदेश सरचिटणीस कृष्णकुमार राठोड ,प्रदेश उपाध्यक्ष अल्पसंख्याक सेल मो.काशीफ, रिसोड तालुका कार्याध्यक्ष जीवन पाटील , मालेगाव तालुका कार्याध्यक्ष निलेश कुटे ,माजी जिप सदस्य भाऊ नाईक, शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय खानझोडे, डॉ ढगे, विवेक पाटील, रिसोड शहराध्यक्ष अरुण श्रीसागर ,जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र घुले , मानोरा शहराध्यक्ष सोहेल अन्सारी, प्रदेश उपाध्यक्ष अल्पसंख्याक सेल वहिदोद्दीन शेख , जिल्हा उपाध्यक्ष राजेश बाजड, जिल्हा संघटक सादिक भाई ,जिप सदस्य सुरेश पाटील गावंडे ,विद्यार्थी जिल्हाध्यक्ष, आकाश शिंदे, मंगरूळपीर शहराध्यक्ष मीर आशिक अली, डॉ.अविष दरेकार, संजय राठोड, प्रशांत ठाकरे, गवळी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष जुम्मा भाई बंदूकवाले, कय्युम जट्टावाले, पिंटू भाई, शकील नौरंगाबादी, चांद मुन्नीवाले, रमजान शेकुवाले, इम्मी भाई, रज्जाक खेतीवाले, मुज्जफर शेख, तुषार बनसोड, शारीक शेख, युसूफ खान मौलाना, तस्लिम रेघीवाले, तौसिफ अकबानी, उस्मान खान, यांचे सह राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमांचा संचालन हमीद शेख यांनी केले.
नियोजनबद्ध पद्धतीने शेतकऱ्यांना साहित्यांचे वाटप जीवनावश्यक साहित्य घेण्यासाठी राष्ट्रवादी कार्यालयासमोर हजारो शेतकरी बांधवांच्या रांगा लागल्या होत्या. प्रत्येक शेतकऱ्यांना अगोदर कुपन देण्यात आले होते त्यामुळे नियोजनबद्ध पद्धतीने साहित्य वाटप करण्यात आले.














