कपिल मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधि चंद्रपुर – आय.सी.आय.सी.आय. फाउंडेशन तर्फे सिंदेवाही तालुक्यातील घोट आणि सावरगाटा येथील गरीब व मध्यमवर्गीय शेतकऱ्यांना अनुदानावर कारले बियाणे व जाळी वाटप करण्यात आले.आय.सी.आय.सी.आय. फाउंडेशन गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मानवी-वन्यजीवन संघर्ष टाळण्यासाठी आणि गाव खेडे आर्थिकदृष्टया समृद्ध व्हावे,गावातच उद्योग उभारून आपल्या उपजीविकेचे साधन निर्माण करावे.यासाठी आय,सी, आय,सी,आय फाऊडेशन आर्थिक पाठबळ देण्यास तयार असून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. याच अंतर्गत, धान पिकाला पर्यायी पीक मिळावे आणि गावांमध्ये भाजीपाल्याचे पीक वाढावे, यासाठी शेतकऱ्यांना अनुदानावर कारले बियाणे आणि जाळी वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या वाटपा प्रसंगी ग्रामपंचायत घोटच्या सरपंच सुनंदा सुरेश गावळे, उपसरपंच कमलाकर लाकडे, आणि ग्रा. प. सदस्य सोनूले यांच्या हस्ते शेतकऱ्यांना कारले बियाणे आणि जाळी वितरित करण्यात आले. यावेळी आय.सी.आय.सी.आय. फाउंडेशनचे विकास अधिकारी, युवराज दाभाडे यांनी फाउंडेशनच्या विविध योजनांबद्दल माहिती दिली. त्यांनी आर्थिक नियोजनाचे धडे आणि वन्यजीव संघर्ष कमी करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले, ज्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक बचत होईल.
यावेळी उपस्थित सर्व शेतकऱ्यांचे आभार रंजित कोटगले यांनी मानले.

