prabodhini news logo
Home चंद्रपूर ॲट्रॉसिटीच्या खोट्या गुन्ह्यात अर्जदाराची फसवणूक करणाऱ्या गैरअर्जदाराची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल...

ॲट्रॉसिटीच्या खोट्या गुन्ह्यात अर्जदाराची फसवणूक करणाऱ्या गैरअर्जदाराची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करा

0
204

कुणबी समाज संघर्ष समितीची मागणी..

उपविभागीय पोलीस अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन

चौकशी न झाल्यास समाज बांधवाकडून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज – ब्रह्मपुरी – येथील फवारा चौकातील गुजरी वार्डात राहणारे अर्जदार पंकज अरुण तुमाने यांनी खोटी माहितीच्या आधारावर तक्रार पोलिसात दाखल केली असून गैरअर्जदार राजू उरकुडे यांना विनाकारण तुरुंगवास भोगाव लागला. त्यांच्या बाजूने न्याय मिळावा व गैर अर्जदारावर उचित कार्यवाही केली जावी यासाठी सोमवार दिनांक २९ जुलै रोजी ब्रह्मपुरी तालुक्यातील अखिल कुणबी समाज बांधवाच्या वतीने ब्रह्मपुरीचे पोलीस उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदनातून मागणी केली आहे.

कुणबी समाजाचे राजू उरकुडे यांच्यावर अत्याचार प्रतिबंधक कायदा (अनुसूचित जाती – जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा) अंतर्गत वरील संदर्भ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.कुनबी समाजाचे राजू उरकुडे यांच्यावर गैरअर्जदार पंकज अरुण तुमाने यांनी कोणताही गुन्हा न करता सुड भावनेने राजू उरकुडे यांना फसविण्याच्या हेतुने पोलिस स्टेशनमध्ये खोटी तक्रार दाखल केली आहे. हा कायदा व सुव्यवस्थेचा भंग असून, जातीचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न आहे.
सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे याबाबत आपल्या स्तरावरून उचित कारवाई करून राजू उरकुडे ह्याला खोट्या गुन्ह्यामधून सुटका मिळवी या करीता आपल्या स्तरावरून प्रयत्न करावेत. शिवाय या प्रकरणी आम्ही आपल्याकडून काही विशेष अपेक्षा करू शकत नाही, मात्र भविष्यात अश्या खोट्या तक्रारी दाखल झाल्यास संपूर्ण शहानिशा करूनच अशा प्रकारच्या ॲट्रॉसिटी प्रकरणांमध्ये वास्तविक दोषी असल्यावरच गुन्हा दाखल करावा. अशी आम्हा समाज बांधवांची मागणी आहे. बरेच लोक जातीचा दुरुपयोग करून जातीवाचक शिवीगाळ केल्याचे खोटी माहिती देऊन अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्ह्यांची नोंद करत असल्याने आम्ही अशा प्रवृत्तीच्या लोकांचा अखिल कुणबी समाज व बांधवांकडून जाहीर निषेध करीत आहोत.

स्वहिताच्या स्वार्थापोटी सामान्य नागरिकांना हे लोक टार्गेट ( लक्ष ) करून त्यांच्याविरुद्ध खोटे तक्रारी करतात, या प्रकरणी सुद्धा संपूर्ण शहाणीसा करूनच दोषी असल्यावरच गुन्हे दाखल करावे. अशी आम्हा समाज बांधवांची विनंती आहे . मात्र निर अपराध माणसाला अशा पद्धतीने खोटया गुन्ह्यात गोवल्या जात असेल तर कुणबी समाज बांधव हे खोटे गुन्हे कथापी सहन करणार नाही.
अन्यथा खोट्या आरोपात समाज बांधवाला अटक करण्यात आली तर कुणबी समाज बांधव आंदोलन करेल. व भविष्यात याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची राहील. अशी मागणी ब्रह्मपुरी तालुका कुणबी समाज संघर्ष समिती व बांधवांतर्फे उपविभागीय पोलीस अधिकारी व तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. यावेळी निवेदन देतांना अँड, मनोहर उरकुडे, प्रा, प्रकाश बगमारे, अविनाश राऊत, यांच्यासह अखिल कुणबी समाजाचे असंख्य समाज बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here