
डॉ. सतिश वारजुरकर यांनी मेश्राम परिवाराची केली आर्थिक मदत
कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर
नागभिड तालुक्यातील गिरगांव गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या झाडबोरी येथिल सुरेश मेश्राम या गरीब कुटुंबाचे राहते घर सतत पडणाऱ्या पावसामुळे २२ जुलै २०२४ ला घर कोसळले. मागील अनेक वर्षापासून ते कौलारु मातीच्या जुन्या घरात राहत होते. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या तडाख्यात सायंकाळी त्यांचे घर कोसळले त्यामुळे अश्या पडक्या घरात राहावे लागत होते .श्री.विनोद वसंतराव बोरकर अध्यक्ष श्रिलक्ष्मी नागरी पतसंस्था गिरगाव व युवा नेते चिमूर विधानसभा LDM तथा समनव्यक झाडबोरी या गावात जाऊन त्यांच्या परिवाराशी भेट घेऊन आर्थिक मदत दिली.
यावेळी शरदजी सोनवणे तालुका सचिव काँग्रेस कमिटी नागभिड, प्रशांत गायकवाड माजी सरपंच ग्रामपंचायत गिरगांव, नाबीजी शेख ग्राम काँग्रेस अध्यक्ष झाडबोरी, हसिम सैय्यद ग्रामपंचायत सदस्य झाडबोरी, ग्यानिदास आदे माजी सदस्य, शंकर निकोडे, अशोक नीकोडे, तिफायात शेख, मलंग शेख, छोटन शेख, हुसेन शेख, व इतर मान्यवर उपस्थित होते.














