राहुल वासनिक जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली – गडचिरोली: दिनांक २९ जुलै ते दिनांक ०९ ऑगस्ट २०२०४ पर्यंत विविध मागण्यासाठी सुरु असलेल्या महाराष्ट्र राज्य कायम विणा अनुदानीत कृती समिती व जिल्हा शिक्षक समन्वय संघ जिल्हा गडचिरोली च्या वतीने सुरु असलेल्या आंदोलनाला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मा.सुरेंद्र भाऊ चंदेल तसेच उपजिल्हाप्रमुख मा.अविनाश भाऊ गेडाम यांनी भेट दिली.
याप्रसंगी शिक्षकांना संबोधित करताना सुरेंद्र भाऊ नी म्हटले की, शिक्षकांच्या या मागण्या रास्त असून सुद्धा सरकार आपल्याला प्रचलित अनुदानापासून वंचित ठेवण्याच काम हे महायुती सरकार करत आहे.अनावशक योजनाची पोखल आश्वासनाची खैरात निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन मताच राजकारण करण्यासाठी पोकळ आश्वासन देऊन जनतेमध्ये संब्रम निर्माण करण्याच काम हे महायुती सरकार करतो आहे.
या महायुती सरकारला झुकवायचं असेल आणी आपल्याला प्रचलित अनुदान घ्यायचं असेल तर हा आंदोलन अधिक उग्र केल्याशिवाय या सरकारला जाग येणार नाही.झोपेच सोंग घेऊन निद्रावस्थेत असलेल्या या ढोंगी सरकारला जाग करण्यासाठी क्रांती करावं लागेल.जो पर्यंत आपलं हक्क मागण्यासाठी क्रांती करत नाही तो पर्यंत आपल्या पदरी कायम निराशा च असेल हा इतिहास आहे.प्रेमाने होत नसेल तर क्रांती केल्याशिवाय पर्याय नाही.यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आपल्या पाठीशी भक्कमपणे पूर्ण ताकदणीशी आहे.त्यासाठी रस्ता रोको आंदोलन करायची वेळ आली तरी सर्व शिवसैनिकांसह जिल्हा गडचिरोली च्या वतीने आम्ही रस्त्यावर उतरून आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी पाठिंबा देण्यासाठी येथे आलो आहे.असे संबोधित करताना म्हटले.
पुढे बोलताना सुरेंद्र भाऊंनी म्हटले की, मी आजच विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा.विजय वड्डेटीवार आणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते मा.अंबादास जी दानवे साहेब यांच्याशी आजच फोन वरून चर्चा करून या आंदोलनाची माहिती देऊन मार्गी लावण्यास विनंती करतो अशी ग्वाही दिली.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष मा.मुरलीधर कवाडकर सर, सचिव नागोसे सर, कार्याध्यक्ष मा.नरेंद्र जी बोरकर आणि बहुसंख्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

