चंद्रपुर जिल्हयातील जिवती,सावली येथील कुटूांबाांना घरकुल निधी द्या..

0
81

सुरेश मल्हारी पाईकराव संस्थापक /अध्यक्ष सफेद झंडा कामगार संघटना जिल्हा चंद्रपूर

कपिल मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर – चंद्रपूर – आज दिनांक 30 जुलै 2024 रोजी सफेद झंडा कामगार संघटना अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव यांच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब यांना मागणी करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्य़ातील जिवती, सावली, तालुक्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील घटकांसाठी गोरगरीब कुटुंब आज सुद्धा पक्का घरापासून वंचित आहे. चंद्रपूर जिल्ह्य़ातील आज सुध्दा कुटूंब पडत्या घरात आपला निवारा करत आहे. आणि हे बाब जिवती, सावली, मुल, चंद्रपूर, तालुक्यात पाहायला मिळतात. तसेच संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्य़ातील अशा कुटुंबातील गोरगरीब गरजु ची निवड करुन सदर लाभार्थीना शासकीय यंत्रणेत राहुन विहित नमुन्यात अर्ज भरुन सेवा सुविधा मिळविणे आर्थिक मदत पदरात पाडून घेणे त्यांना शक्य होत नाही आहे . म्हणून जिल्हाधिकारी यांनी गाववस्ती विभागून उपलब्ध शासकीय यंत्रणेतून गरजूंना प्रत्यक्ष अर्ज भरुन घेवून या योजनेकरिता लाभार्थी म्हणून त्यांची नोंद करुन घेवून त्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत व पक्के घरे बनविण्यासाठी लवकरात लवकर घरकुल निधी उपलब्ध करून देण्यात यावा. अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली निवेदन सादर करतांना सुरेश मल्हारी पाईकराव संस्थापक अध्यक्ष सफेद झंडा कामगार संघटना जिल्हा चंद्रपूर, बबन वाघमारे विजय कवाडे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here