prabodhini news logo
Home चंद्रपूर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अध्यक्ष पदी माजी आमदार अतुल देशकर तर...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अध्यक्ष पदी माजी आमदार अतुल देशकर तर सदस्य पदी अरविंद राऊत व किशोर वाकुडकर यांची निवड.

0
151

कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील सनियत्रण व आढावा समितीमध्ये विधानसभा क्षेत्र अध्यक्ष पदी ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय माजी आमदार अतुल भाऊ देशकर तर सदस्य पदी माजी सभापती अरविंद राऊत व किशोर वाकुडकर यांची निवड करण्यात आली.
सदर निवड मान. सुधीर भाऊ मुनगंटीवार, वने व सांस्कृतिक, मत्सव्यवसाय मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री चंद्रपूर यांच्या शिफारशीनुसार कऱण्यात आली.
समितीच्या अध्यक्ष व सदस्य पदावरून महिलांच्या हितासाठी सकारात्मक परिवर्तन घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य होणार तसेच विधानसभा क्षेत्रातील जास्तीत जास्त महिलांना या योजनांचा लाभ मिळवून देऊन महिलांना सक्षम करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.
सदर निवडीबद्दल सिंदेवाही भाजपा तालुका अध्यक्ष राजू पाटील बोरकर, तालुका भाजपा सरचिटणीस नागराज गेडाम माजी सभापती जि. प., भाजपा ज्येष्ठ नेते प्रा. गोपीचंद गणवीर, युवा नेते रितेश अलमस्त, यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here