रोहित बंसोड (चित्रकार) याने वाढदिवसा निमित्य जपली सामाजिक बांधिलकी
कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर
सिंदेवाही तालुक्यातील अंतरगांव येथील रहिवासी रोहित बंसोड (चित्रकार) याने सामाजिक बांधिलकी जपत, बुधवार ( दि.३१ जुलै) आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिंदेवाही तालुक्यातील चिखल मिनघरी या अगदीच कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना बूक, पेन वितरण करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले.तसेच शाळेच्या आवारात मागील तीन वर्षी प्रमाणे यंदाही वृक्षारोपण केलं.हा स्तुत्य उपक्रम रोहित बंसोड यांनी राबविला.यावेळी शाळेचे शिक्षक मैदनवार, मिनघरी ग्रामपंचायत चे उपसरपंच विमीत दहिवले, चिखल मिनघरी येथील वैभव आत्राम , सुंदराबाई दरांजे उपस्थित होते.

