prabodhini news logo
Home चंद्रपूर विदर्भाचा गायक प्रणय गोमाशे “होऊ दे चर्चा” कार्यक्रमात,सन मराठी चॅनल वर …!

विदर्भाचा गायक प्रणय गोमाशे “होऊ दे चर्चा” कार्यक्रमात,सन मराठी चॅनल वर …!

0
203

महाराष्ट्रातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावलेल्या व सर्वत्र चर्चेत असणारा सन मराठी वरील “होऊ दे चर्चा कार्यक्रम,आहे घरचा..!” ह्या मुलाखतीच्या नव्या कार्यक्रम विदर्भातील युवा गायक प्रणय गोमाशे ह्यांची मुख्य गायक म्हणून निवड झाली आहे. सुप्रसिद्ध विनोदी कलाकार भाऊ कदम ओंकार भोजने,सुप्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर व समीर वानखेडे, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे असे अनेक मान्यवर या कार्यक्रमात हजेरी लावणार असुन उपस्थित दिग्गजांकरिता एक गाणे प्रणय गोमाशे व सुप्रसिध्द गायीका ऋतुजा दुर्गे सोबात गाणार आहेत.
कार्यक्रमाचे स्वरूप जरा आगळे वेगळे असल्यामुळे ह्या कार्यक्रमाची चर्चा महाराष्ट्रभर सध्या सुरू आहे,
कार्यक्रमाचे नाव होऊ दे चर्चा कार्यक्रम आहे घरचा असल्याने आलेल्या मान्यवरांना बोलक करण्याचे काम महाराष्ट्राची अप्सरा व सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी अगदी चोख पणे केले आहे.
विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील युवा गायक प्रणय गोमाशे हे यापूर्वी झी मराठीवरील “जाऊ बाई गावात” कार्यक्रमात सुद्धा टीव्हीवर झळकले असुन भारतातील अनेक मोठ्या व्यासपीठावर गायक प्रणय गोमाशे यांनी आपले गायन सादर केले आहे.
नुकताच आध्यात्मिक गुरु श्री सत्यसाईबाबा यांच्या मुख्य समाधीपुढे, पुट्टपर्थी,आंध्र प्रदेश येथे त्यांची गायन सेवा झाली होती.
“होऊ दे चर्चा कार्यक्रम आहे घरचा” या कार्यक्रमात गायक प्रणय गोमाशे यांना साथ सांगत म्हणून, सुप्रसिध्द संगीत संयोजक शैलेश पाटोळे (कीबोर्ड), Zee मराठी जाऊ बाई गावात फेम पॅड वादक सुरेंद्र (बाबू) निकम, zee मराठी चला हवा येऊ द्या फेम ढोलक वादक नितीन वाघ व अनेक मान्यवर प्रत्येक रविवारी रात्री 9 वाजता सन मराठी चॅनेल वर दिसणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here