राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेत विद्यार्थ्यांचा गुणगौरव देशभरातून 766 विद्यार्थ्यांचा सहभाग

0
272

सोनाली घाटगे उपसंपादक प्रबोधिनी न्युज पुणे – ग्लोबल व्हिजन फाउंडेशन पुणे संचलित इन्स्पायर अबॅकस ॲण्ड वेदिक मॅथ अकॅडमीच्या वतीने लोहगाव येथे राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेला देशभरातून 766 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
रविंजय पार्क, पवार वस्ती रोड, लोहगाव, पुणे येथे ही स्पर्धा पार पडली. सकाळच्या सत्रात घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी मोठमोठी गणिते झटपटपणे सोडवून, अवघ्या 5 मिनीटाच्या आतमध्ये आपला पेपर सोडवित उपस्थितांना आश्चर्यचकीत केले.
प्राचार्य, डॉ. संजय गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना अबॅकस शिक्षण मुलांच्या बुध्दीमत्तेला चालना देणारे आहे. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणातच अबॅकस शिक्षण समाविष्ट करण्याची गरज आहे असे ते म्हणाले.
त्याचप्रमाणे सौ. वसुंधराताई उबाळे यांनी आपल्या मनोगतामध्ये अबॅकस आणि वैदिक गणित शिक्षणामध्ये इन्स्पायर अबॅकस ॲण्ड वेदिक मॅथ अकॅडमी महत्त्वाचे योगदान देत असुन विद्यार्थ्यांना घडविण्याचे महत्वाचे कार्य करत आहे असे त्यांनी सांगितले.
या अबॅकसच्या राष्ट्रीय स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळविलेले काश्वी राठोर, तनुजा काळे, आराध्य मते, आर्वी पायाळ, अंशुमन रोहीला या 5 विद्यार्थ्यांना अकॅडमीच्या वतीने प्रत्येकी 3 हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले.
राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी असद इनामदार, काश्वी राठोर, पार्थ कदम, आर्य आरडे, राजवीर उढाणे, आराध्य मते, ईश्वरी गदादे, श्रेया रकटाटे, श्रीयान ताडस, अंशीता साकटेल, दिपराज चव्हाण, आर्वी पायाळ, अंशुमन रोहीला, अक्षदा पाटील, ऋतीका निकम, आरुष नलावडे, तनुजा काळे, मयुरेश पाटील या विद्यार्थ्यांना सर्वोतम असे चॅम्पियन ट्रॉफीचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
अकॅडमीत विद्यार्थी घडविण्याचे कार्य करणाऱ्या ज्योती बांदल, प्रियंका पायाळ, स्वाती रकटाटे, शितल जगताप, माया भोसले, श्रावणी राऊत, ऋषीका खांदवे, पल्लवी भोयटे, आशा साठे, अश्विनी उमाप, भाग्यश्री काळे व मनिषा रकटाटे या शिक्षिकांना बेस्ट टीचर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी आष्टी पंचायत समितीचे माजी सभापती मा. गोपाळभाऊ रक्ताटे, माजी कृषी अधिकारी मा. बलभीम शेळके, सरपंच मा. वसुंधरा उबाळे, प्राचार्य मा.डॉ. संजय गायकवाड, मा. नारायण गलांडे, मा. संतोष भंडारी, हभप डॉ.श्री. अरविंद काळे, हभप कैलास सातव, मा. करण तावरे, मा.श्री. रोहन काळे, मा.प्रा. जयसिंग कारखिले, मा. अभिजीत पवार, मा. विकास चव्हाण, मा. हनुमंत आघाव, मा. बाळासाहेब सायंबर, मा. सदानंद चव्हाण, मा.प्रा. रमेश रोडे, मा. प्रकाश लोखंडे, मा.श पंकज ठोंबरे, मा. प्रदिप उबाळे, मा. संजय शेळके, मा. नामदेव पाटील वाळके, मा. राहुलराजे भोसले, मा. अजित पाटील, मा. प्रसाद कदम, मा. विकास खांदवे, मा. राजेश्वरी राजेभोसले, मा. सुनंदा काळे, मा. शालिनी सातव, मा.प्रा. अनिकेत काळे, आदींसह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अकॅडमीच्या अध्यक्षा अर्चना शेळके, सचिव दादासाहेब शेळके, संचालक रविंद्र रकटाटे, जय शेळके, श्रीतेज रकटाटे व सर्व शिक्षक वर्गाने परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी जोशी यांनी केले. प्रास्ताविकात संस्थेचे सचिव दादासाहेब शेळके यांनी अबॅकस व वैदिक गणितची माहिती दिली. आभार प्राध्यापक चक्रधर शेळके यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here