prabodhini news logo
Home ठळक बातम्या “भगवा सप्ताह निमित्य” दारव्हा तालुक्यातील विविध ठिकाणी जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे यांच्या हस्ते...

“भगवा सप्ताह निमित्य” दारव्हा तालुक्यातील विविध ठिकाणी जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन

0
113

प्रशांत देशपांडे जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ दारव्हा- दिनांक ०४/०८/२४ रोजी दारव्हा तालुक्यातील बागवाडी,साजेगाव पिंपरी, दहेली, धनगरवाडी येथे जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवर बोलून कामे मार्गी लावा अन्यथा शेतकऱ्यांना ऑफिसमध्ये आणून शिवसेना स्टाईलने उत्तर देईल अशा केल्या सूचना यावेळी उपस्थित दिग्रस विधानसभा संपर्कप्रमुख नितीन बोरकर उपजिल्हाप्रमुख अजय घाडगे तालुकाप्रमुख संतोष ठाकरे तालुका संघटक,शहर प्रमुख अमोल दुधे, सुधाकर पिंगाने,युवासेना तालुकाप्रमुख गोपाल भोयर, उपतालुका प्रमुख रामेश्वर गिरी,विभाग प्रमुख रामा लोंढे, तुकाराम तुळजापुरे, प्रशांत तुळजापुरे,श्रावण चव्हाण, गजानन केंबल व गावातील नागरिक तसेच शिवसेना युवासेना अल्पसंख्यांक विद्यार्थी सेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here