prabodhini news logo
Home ठळक बातम्या “भगवा सप्ताह निमित्य” दारव्हा तालुक्यातील भुराजी महाराज संस्थान महातोली ता दारव्हा येथे...

“भगवा सप्ताह निमित्य” दारव्हा तालुक्यातील भुराजी महाराज संस्थान महातोली ता दारव्हा येथे शिवसेनेची जि.प.व प.स. पदाधिकारी बैठक

0
104

प्रशांत देशपांडे जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ – दारव्हा – दिनांक ०४/०८/२४ रोजी दारव्हा तालुक्यातील भुराजी महाराज संस्थान येथे जिल्हा परिषद पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्हाप्रमुख श्री प्रवीण शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी विविध विषयावर येणाऱ्या विधानसभा,जि प व प स निवडणूकिवर चर्चा झाली यावेळी जिल्हाप्रमुख यांनी आपल्या भाषणातून दारव्हा दिग्रस विधानसभेवर भगवा फडकविल्याशिवाय राहणार नाही असे विधान केले तसेच शेतकरी व सर्वसामान्य लोकांचे कामे करण्यासाठी शिवसेना सदैव तयार आहे.

यावेळी उपस्थित दिग्रस विधानसभा संपर्कप्रमुख नितीन बोरकर, उपजिल्हाप्रमुख अजय घाडगे तालुकाप्रमुख संतोष ठाकरे तालुका संघटक सुधाकर पिंगाने,युवासेना तालुकाप्रमुख श्री गोपाल भोयर,उपतालुकाप्रमुख रामेश्वर गिरी,विभाग प्रमुख रामा लोंढे ,राजेश पवार,माजी प.स सदस्य संतोष ढोके, राविभाऊ ठाकरे,किशोर काकस, तुकारामजी तुळजापुरे, प्रशांत तुळजापुरे,श्रावणभाऊ चव्हाण, गजानन केंबल,प्रकाश खडसे, शंकर वयले व आजूबाजूच्या परिसरातील, नागरिक तसेच शिवसेना, युवासेना, अल्पसंख्यांक विद्यार्थी सेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here