
सोनाली घाटगे उपसंपादक प्रबोधिनी न्युज – दिनांक ०४/०८/२४ रोजी जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे यांच्या हस्ते दारव्हा शहरातील नूर नगर, शिवनगर व तेलीपुरा येथे शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी दारव्हा शहरातील अनेक युवकांनी खासदार श्री संजयभाऊ देशमुख यांच्या नेरुत्वात व जिल्हाप्रमुख यांच्या हस्ते पक्षप्रवेश केला. शहरातील नागरिकांनी जिल्हाप्रमुख यांना संवाद साधला असता नागरिकांनी पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहे असे सांगितले.
यावेळी दिग्रस विधानसभा संपर्कप्रमुख नितीन बोरकर तसेच उपजिल्हाप्रमुख अजय घाडघे शहर प्रमुख अमोल दुधे, तालुकाप्रमुख संतोष ठाकरे तालुका संघटक सुधाकर पिंगाने,युवासेना शहर प्रमुख विकी जामकर,युवासेना तालुकाप्रमुख गोपाल भोयर, विद्यार्थीसेना जिल्हाप्रमुख कृष्णा निंबरते, अल्पसंख्यांक आघाडीचे दानिश शेख, रवी तरटे,अजिंक्य निमकर,शेख अरबाज, स्वप्निल मापारे,सुरेश राठोड, गजानन केंबल, विलास राठोड, विष्णू पाटील,संजय देशमुख, उमेश बुलबुले, सुरेश चतुर, विजय डांगरा, प्रकाश खडसे शंकरराव वहिले सौरभ लोंढे उपस्थित असून शिवसेना, युवासेना, विद्यार्थी सेना, अल्पसंख्यांक आघाडी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..














