मनिषा तिरणकर यांना राष्ट्रीय सेवारत्न पुरस्कार जाहीर

0
277

यवतमाळ – अ.भारतिय महिला संवैधानिक हक्क परिषदेच्या राज्याध्यक्ष मनिषा तिरणकर यांना त्यांच्या सामाजिक, साहित्यिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मराठी साप्ताहिक महाराष्ट्र मिडिया आयोजित औरंगाबाद येथील कारेक्रमात राष्ट्रीय सेवा रत्न पुरस्काराने सन्मानित केल्या जाणार आहे
हा सोहळा औरंगाबाद येथील एकता सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित केला आहे.
या सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष:मा.प्रा.टि.पी मुंडे,प्रांताध्यक्ष राहणार असून या.अनिलजी मोरे मराठी चित्रपट अभिनेते,मा.विक्रमजी काळे, आमदार शिक्षक मतदार संघ, औरंगाबाद यांचे हस्ते वितरित केल्या जाणार आहेत आणि या करेक्रमाचे मुख्य अतिथी मा. आ.एम.एम .शेख माजी विधानपरिषद सदस्य, विशेष अतिथी मा.हर्षल जरोदे,ओनर ओलिंडा पेन्टस प्रा.लिमिटेड नाशिक, प्रमुख पाहुणे मा.संगीताताई जामगे , जेष्ठ साहित्यिक पुणे,मा.शोभा बिहाडे, चित्रपट निर्माती,बेटा प्रदेश में ,मा.ज्योती सदाशिव , बिझनेस क्वार्डिनेटर, बुलढाणा,मा.अनिल नरेडी, सहनिर्माते, संविधान एक रास्ता,मा.प्रा.अशोक जोंधळे , जेष्ठ संगीतकार परभणी हे उपस्थित राहणार आहेत.हा करेक्रम दि.१७ आगस्ट २०२४ ला मौलाना रिसर्च सेंटर मजनु हिल टिव्ही सेंटर रोड औरंगाबाद इथे पार पडणार असून या करेक्रमाचे मुख्य संयोजक अजमत खान, रमाकांत कुलकर्णी, जेष्ठ पत्रकार, अध्यक्ष पुरस्कार निवड समिती, बालासाहेब फड,निंमत्रक, जेष्ठ पत्रकार तथा संपादक, दैनिक द . सोमेश्वर साथी हे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here