

सोनाली घाटगे उपसंपादिका प्रबोधिनी न्युज- डॉ. ऐश्वर्री राठोड यांची महाराष्ट्र प्रदेश प्रभारी माजी मिनिस्टर रमेश चिनीथल्ला यांच्याशी सदिच्छा भेट झाली आणि तसेच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी ही सदिच्छा भेट झाली. यावेळेस जामनेर तालुक्याच्या विधानसभा विषयीची चर्चा आणि जामनेर विधानसभा हे काँग्रेस पक्षाला सुटावी अशी अपेक्षा आणि मनोगत व्यक्त केले. तसेच काँग्रेस पक्षासाठी कशाप्रकारे कार्यरत आपण एकनिष्ठतेने करत आहोत. या सर्व गोष्टींची माहिती आदरणीय डॉ.ऐश्वर्री राठोड यांचे भाऊ बुलढाणेकर पदवीधर आमदार धीरज लिंगाडे यांच्या घरी चर्चा झाली. तसेच डॉ. ऐश्वर्री राठोड यांनी पदवीधर आमदार धीरज लिंगाडे यांचे आभार मानले आणि रक्षाबंधन बद्दल हीच सदिच्छा भेट आमदार धीरज लिंगाडे यांनी दिली असे मनोगत व्यक्त केले.














