
कपिल मेश्राम जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर- आज दिनांक १६ ऑगस्ट २०२४ ला राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.ना.विजय वडेट्टीवार यांच्याकडून निमगाव येथील अपंगत्व आलेल्या तरुणास पुढील उपचारासाठी मदत देण्यात आली आहे.
प्रकाश भोजराज दासरवार वय २४ वर्षे रा.निमगाव सदर युवक हा बऱ्याच दिवसापासून तबेत खराब असल्यामुळे उपचार घेत होता परंतु दुर्दर आजारामुळे त्याला अपंगत्व आले त्याचे उठणे बसने कायमचे बंद झाले त्याला उभे राहण्यासाठी काठी किंवा घोडिचा आधार घ्यावा लागतो.घरातील कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे सदर कुटुंबियांना आर्थिक माहिती असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा.निखिल सुरमवार यांना मिळताच त्यांनी आमदार विजय वडेट्टीवार यांना संपर्क साधून तात्काळ आर्थिक मदत मिळवून दिली.
आर्थिक मदत देताना निमगाव येथील उपसरपंच मा.राजु पाटील ठाकरे, मा.सचिन टोन्गे आदी उपस्थित होते.














