पुनाजी कोटरंगे
तालुका विशेष प्रतिनिधी
प्रबोधिनी न्यूज सावली
सावली – 15 ऑगस्ट हा दिवस म्हणजे स्वातंत्र्याचा. भारतीयांच्या आजादीचा महाउत्सव. संपूर्ण भारतात मोठ्या हर्षोउल्हासात साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही अडपल्ली चक येथे सकाळी जि. प. शाळेत तर संध्याकाळी महामाया बुद्ध विहाराच्या भव्य पटांगणात आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष – विनोद डी. झाडे (बौद्ध समाज अध्यक्ष अडपल्ली चक), कार्यक्रमाचे उपाध्यक्ष – संदिप बि. निमसरकार (मुख्या.आदि.आश्रम शाळा तोहगाव), उद्घाटक – मरिया कोरडे (पोलीस पाटील अडपल्ली चक), सहउद्घाटक – कवी/लेखक प्रभाकर डी. दुर्गे तर प्रमुख पाहुणे म्हणून राहुल दुधे, खेमराज चांदेकर, पौर्णिमा निमसरकर, आकाश नागोसे, तुळशीराम बावणे, प्रतिमा झाडे, दिलीप चलावार, राहुल बावणे, गमतीदास अलोने हे होते.
या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा जीवक अलोने (इयत्ता ८ वी) व रक्षा उराडे (इयत्ता ७ वी) या दोन चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सांभाळली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक खेमराज चांदेकर यांनी केले. या कार्यक्रमांमध्ये मान्यवरांसहित जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांचे भाषणं, समुहगीते व देशाच्या आधारावर अनेक प्रकारचे नृत्य सादर करण्यात आले. त्यानंतर आकाश नागोसे व राहुल बावणे यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना शालेय जीवनात सतत उपयोगी पडणाऱ्या वस्तू उदा. नोटबुक पेन-पेन्सिल मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात संदीप बि. निमसरकार व कवी/लेखक प्रभाकर डी. दुर्गे यांच्या तर्फे समस्त गावकऱ्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली. हा कार्यक्रम व्यवस्थित रित्या घडवून आणण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय अडपल्ली चक तसेच बौद्ध समाज अडपल्ली चक चे युवा गौरव उराडे, काजू दुर्गे, दिनेश जीवने, प्रमाग गलबले, सुजल वनकर व विशेष सहकार्य म्हणून सुदिप्ता गोटा, सुनीता पूनघाटे मॅडम व समस्त अडपल्ली चक गाव वासीयांनी खुप कष्ट घेतले.

