सदलगा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क- सदलगा शहरातील ओम शांती केंद्राच्या संचालिका ब्रह्मकुमारी बी के सुनंदा व बी के भारती यांच्यावतीने सदलगा शहरातील एन डी आर एफ, अग्निशमन दल, प्राथमिक आरोग्य केंद्र सदलगा ,पत्रकार संघ सदलगा. इत्यादी क्षेत्रातील कार्य करणाऱ्या सर्वांना एका व्यासपीठावर बोलावून पवित्र नात्याचा सण रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपस्थित सर्वांना बी के सुनंदा व बि के भारती यांनी राखी बांधल्या व रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी बी के सुनंदा, एन डीआर एफ टीमचे कॅप्टन बबलू बिस्वास, अग्निशमन दलाचे मुख्य एच एम नरगुंद यांची रक्षाबंधन या विषयावर भाषणे झाली. याप्रसंगी सर्वांना मिठाई वाटण्यात आली.
रक्षाबंधनाच्या कार्यक्रमास ओम शांती केंद्राच्या संचालिका बी के सुनंदा, बी के भारती, एन डीआर एफ टीमचे कॅप्टन बबलू बिस्वास, अग्निशमन दलाचे मुख्य एच एम नरगुंद, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पुगतेनहटी, शहरातील ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम, तात्यासाहेब कदम, मकरंद द्रविड, भरत सकपाळ ओम शांती केंद्राचे कार्यकर्ते तुषार पोतदार, सुतार, सदानंद मुतनाळे, त्यांच्यासह एन डी आर एफ ग्रुपचे संतोष धर्मे, भगत गंगाराम, विक्रम रेड्डी, प्रमोद मोहंती, सुनील रामटेके, एल व्ही विवेक. कॉन्स्टेबल एम एम कपरेल, डी ए तंगडे, नागप्पा पाटील, रमेश परीट, विजय देयानवर, इत्यादी सह 50 ते 60 कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित सर्वांचे आभार एन डीआर एफ टीमचे संतोष धर्मे यांनी मानले.

