दलित युथ पँथर संघटनेच्या वतीने चापोली रास्ता रोको आंदोलन

0
233

दिड तास चक्काजाम

सोनाली घाटगे उपसंपादक प्रबोधिनी न्युज – चाकूर येथील लातूर-नांदेड रोडवर दलित युथ पँथर संघटनेच्या वतीने लातूर जिल्हयातील झालेल्या दलित हत्याकांड निषेधार्थ विविध मागण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मा. पँथर निलेशजी मोहिते यांच्या आदेशाने लातूर जिल्हाध्यक्ष पँथर सुशिल सरकाळे, जिल्हासचिव आकाश कांबळे यांनी लातूर जिल्हयातील सर्व पिडीत कुटूंबांस या आंदोलनात सहभागी करून घेवून त्यांच्या प्रतिक्रीया प्रशासनापुढे मांडल्या. या आंदोलनात हत्याकांडातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासाठी मागणी करण्यात आली.
यावेळी सिराज देशमुख, अशोक कांबळे, गोविंद कलवले, गणेश तेलंगे, अविनाश कांबळे, बालाजी सरकाळे, गोपाळ सरकाळे, हरिश कांबळे, बुध्दभुषण मोरे, अनिल सरवदे, भिमराव कांबळे, नितीन कांबळे, मनोज कांबळे, अशिष बनसोडे, सचिन भालेराव, विकास भालेराव, बाबा मोमीन, अतिश सरकाळे, बुध्दभुषण गायकवाड, आकाश चापोलीकर, लक्ष्मण भालेराव, पांडूरंग कांबळे, अमर माने, माऊली चाटे, अविनाश सरकाळे, सिध्दार्थ गायकवाड, विश्वनाथ कलवले, सचिन कांबळे, प्रभू शिंदे, रविकिरण कांबळे, सोमनाथ कलवले, बबलू कांबळे, बाळू कांबळे, अजय कांबळे, सतीश कांबळे, सुमित कांबळे, अमद मुजावर, अॅड. सचिन चाकूरकर, मिलिंद सरकाळे, विनोद बोडके, राजरत्न सरकाळे व दलित युथ पँथर कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती. तसेच लक्ष्मण पेटकर, निलेश मद्रेवार, अविनाश सरकाळे, श्रीरत्न गायकवाड, मुसदीक देशमुख, विश्वनाथ कलवले यांनी आंदोलना दरम्यान मार्गदर्शन केले.

आंदोलना दरम्यान अम्ब्युलंन्सला जाण्यासाठी जागा दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here