
आरमोरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दिनांक 15 आगस्ट 2024, ला सकाळी 11 वाजे च्या सुमारास आरमोरी बर्डी येथील एका कॅफेत काम करणाऱ्या मुलीवर आरमोरी येथीलच सोहेल व अयुब या दोन युवकांनी एका छोट्याश्या कारणावरून कॅफेत घुसून मारहाण केली, त्या असहाय मुलीचे केस ओढून मारहान केली.
सदर घटना ही अतिशय निंदनीय असून समाजवादी पक्ष गडचिरोली तर्फे सदर घटनेचा तीव्र जाहीर निषेध करण्यात येत आहे.
तसेच या हल्ल्यात सहभागी सोहेल व अयुब यांचे सहित सहभागी त्यांच्या साथीदाराला ताबडतोब अटक करून कडक शिक्षा करण्यात यावी अशी मागणी समाजवादी पार्टी जिल्हा अध्यक्ष इलियास खान, सपा अल्पसंख्यांक विभाग जिल्हा अध्यक्ष खलील खान, सपा महिला सभा जिल्हा अध्यक्ष सीमा डोंगरे, सपा युवाजण सभा जिल्हा अध्यक्ष कैलास बगमारे यांनी केलेली आहे.














