शहीद डाँ.नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिदिनानिमीत्य निर्भय मार्निंग वाक व सर्प विज्ञान प्रबोधन कार्यक्रम संपन्न   

0
102

महाराष्ट्र अंनिसचा ऊर्जानगरचा उपक्रम   

सुविद्या बांबोडे जिल्हा संपादक चंद्रपूर – ऊर्जानगर(चंद्रपूर) – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष शहीद डॅा.नरेंद्र दाभोळकर यांचा दि.२० आगस्ट २०१३ ला सकाळी मॉर्निग वॅाकवरून परत येताना त्याच्यावर गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली.त्या घटनेला ११ वर्षे पूर्ण झाली.
शहीद डॅा.नरेंद्र दाभोळकर यांचा स्मृतिदिन हा सर्वत्र राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन म्हणून साजरा होत आहे त्यनिमित्य सकाळी मार्निंग वाक घेण्यात आली नंतर शहीद डाँ नरेंद्र दाभोळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार वाहून अभिवादन करण्यात आले व यावेळी खालील घोषणा देण्यात आल्या.
शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर, अमर रहें, अमर रहें., फुले शाहू आंबेडकर, आम्ही सारे दाभोळकर, उठ माणसा जागा हो,अंनिसचा एक धागा हो,
हल्लेकरांनो हाय हाय, विवेकाचा आवाज संपणार नाय, आवाज दो,हम एक है,विवेकाचा आवाज, बुलंद करूया.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा ऊर्जानगरच्या वतीने वसाहतीतील पर्यावरण चौक येथून सौदामिनी चौक मार्गे पोस्ट आफिस द्वारा आंभोरा चौकातुन वापस पर्यावरण चौक पर्यंत घेण्यात आली.ही मार्निंग वाक चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष पी एम जाधव सर व अध्यक्ष मा सूर्यकांत खणके यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. यावेळी महा अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष पी एम जाधव सर, जिल्हा प्रधान सचिव मा नारायण चव्हाण, ऊर्जानगरचे कार्याध्यक्ष मा.देवराव कोंडेकर, अध्यक्ष मा.मुरलीधर राठोड,प्रधान सचिव बाळकृष्ण सोमलकर, किशोर मुगल, दुरेंद्र गेडाम, संजय जुनारे,सुरेंद्र इंगळे,भैयाजी उईके,सुभाष भानारकर आणि वंदना मनपे महिला सहकार्यवाहक व त्यांचा योगा महिला ग्रुप तसेच समितीचे पदाधिकारी आणि सदस्य यांची उपस्थिती होती.तसेच दुपारी ऊर्जानगर वसाहतीच्या बाजूच्या गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खैरगांव (चांदसूरला) येथे मा.पी एम जाधव यांच्या सर्प विज्ञान प्रबोधन मार्गदर्शन व प्रदर्शनी कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी शाळेला सापाच्या माहितीचे पोष्टर व अंनिस मासिक भेट देण्यात आली या कार्यक्रमात सापाविषयी असलेले समज गैरसमज चित्र फितीद्वारा विद्यार्थ्यांना सांगण्यात आले व सापाच्या प्रकाराबद्दल (विषारी बिनविषारी) माहिती देण्यात आली यावेळी अंनिस पदाधिकारी व शिक्षक सुरेंद्र शेंडे,शिक्षिका गीता आणि विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here