रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज – दिवसरात्र समाजाची सुरक्षा करीत वाईट प्रवृत्तीच्या इसमांना धडा शिकवुन समाजातील स्त्रियांना सुरक्षितता प्रदान करण्यासाठी महत्वाची भुमिका पोलीस बांधव पार पाडत असतात. समाजातील स्त्रियांचे पाठीराखे बनुन भावासमान त्यांची सुरक्षितता करत असतात. अशा पोलिस बांधवांना रक्षाबंधनाचे औचित्य साधून ब्रम्हपुरी पोलिस स्टेशन येथे जावून महीला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राख्या बांधल्या आहेत.
सोबतच पक्षकार्य करीत असतांना पक्षामध्ये सोबत घेऊन चालत भावासमान प्रत्येक गोष्ट समजावून सांगणारे व प्रत्येक अडीअडचणीच्या संकटकाळात मदतीसाठी धावून येत भावासम पाठीशी उभे राहणारे महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांचे औक्षण करीत यावेळी महीला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राख्या बांधल्या.
यावेळी महीला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंगला लोनबले, महीला काँग्रेसच्या शहराध्यक्षा योगिता आमले, बाजार समितीच्या उपसभापती सुनीता तिडके, सोशल मीडिया प्रमुख रश्मी पगाडे, माजी नगरसेविका वनीता अलगदेवे, गीता मेश्राम, कल्पना तुपट यांसह अन्य महीला काँग्रेसच्या महीला कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

