
कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर
सिंदेवाही तालुक्यातील अंतरगांव येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदी तिसऱ्यादा शेखर मामिडवार यांची अविरोध निवड करण्यात आली. अंतरगांव ग्रामपंचायत मधे नुकतीच ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.सामाजिक कार्यात नेहमी भाग घेऊन सहकार्य करणारे आणि लोकांच्या मदत कार्यात त्यांचा नेहमी सहभाग असतो असे शेखर ममिडवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या सभेला ग्रामपंचायत पदाधिकारी ,सदस्य व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.यांच्या निवड़ी मुळे प्रविण कामडी,विनेश झोडे,विनोद ठीकरे, सकुर शेख, रंजीत श्रीरामे,आणि समस्त ग्राम वासीय यांनी अभिनदंन केले आहे.














