परळी प्रतिनिधी:- परळी शहरातील भीम नगर येथील शेतकऱ्यांची मुलगी डॉक्टर बनणार असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकार द्वारे देण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की परळी शहरातील भीम नगर येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेले विलास भानुदास आदोडे यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा शैक्षणिक वारसा किंवा शैक्षणिक वातावरण व शैक्षणिक मार्गदर्शन नसताना यांची मुलगी कुमारी अनिशा विलास आदोडे तिने नेट परीक्षेत 572 मार्क देऊन घवघवीत यश संपादन केल्यामुळे तिची आंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ मेडिकल कॉलेज येथे एमबीबीएस साठी निवड झाली असून तसे तिला आज दिनांक एक नऊ 2024 रोजी नियुक्तीपत्रही प्राप्त झाले असून तिच्या या यशाबद्दल भीमनगर वासियाकडून तिचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत असून पुढील कार्यास शुभेच्छा ही देण्यात आल्या असल्याची माहिती ही प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे

