prabodhini news logo
Home चंद्रपूर महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती च्या आंदोलनाला पाठिंबा देत लहू...

महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती च्या आंदोलनाला पाठिंबा देत लहू म्हरसकोल्हे यांचे आमरण उपोषण.

0
138

प्रियंका मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर : महानिर्मिती मध्ये कार्यरत जवळपास १६ हजार कामगारांनी कामगारांच्या हितासंदर्भात असलेल्या मागण्यांना घेऊन मागील १५ दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. सदर कामगारांच्या आंदोलनाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता कामगार नेते श्री हेरमन जोसेफ जी यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. तब्बल १० दिवसाच्या उपोषणामुळे तब्बेत खालावल्याने दवाखान्यात भरती करण्यात आले.

कामगारांचे आंदोलन कमजोर होऊ नये या हेतूने सर्व कामगारांच्या मागण्यांना पाठिंबा देत आज राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित पॉवर फ्रंट कामगार संघटनेचे श्री लहू शांताराम मरसकोल्हे यांनी आजपासून मेजर गेट जवळ आमरण उपोषणाला सुरुवात केली.

राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित पॉवर फ्रंट कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री युवराज भाऊ मैन्द यांच्या नेतृत्वात आज सुरु केलेल्या उपोषणावेळी राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय सेलचे जिल्हाध्यक्ष पंकज ढेंगारे, राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप बिसेन, तालुका उपाध्यक्ष राजा शेख, अमोल पारशिवे, राहुल रामटेके उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here