prabodhini news logo
Home ठळक बातम्या नदी नाल्याला आलेल्या पुराचे पाण्यामधून किंवा पुलावरून जाण्याचे धाडस म्हणजे जीवनाचा अंत.-समाजसेवक...

नदी नाल्याला आलेल्या पुराचे पाण्यामधून किंवा पुलावरून जाण्याचे धाडस म्हणजे जीवनाचा अंत.-समाजसेवक संजय कडोळे

0
108

शारदा भुयार जिल्हा प्रतिनिधी,वाशिम : सद्य स्थितीत आसना चक्रवाताच्या परिणामाने,बंगालच्या उपसागरावर अतिशय कमी दाबाच्या पटट्याची निर्मिती होऊन त्याचा सरळ सरळ परिणाम महाराष्ट्रातील पश्चिम विदर्भासह अख्ख्या मराठवाड्यावर झाल्यामुळे पश्चिम विदर्भासह मराठवाडा खान्देश उत्तर महाराष्ट्र,पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळत आहे.शिवाय बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या क्षेत्रामुळेच,यावेळी परतीचा पाऊस जवळ जवळ एक महिना लांबला असून,मोसमी पावसाचा मुक्काम महाराष्ट्रात वाढलेला दिसत आहे.ह्या वातावरणामुळे गेल्या शनिवार पासून सलग तिन दिवसां पासून कारंजा-मानोरा- वाशिम-यवतमाळ-हिंगोली-परभणी-नांदेड-माहूर-बिड-लातूर-जालना-औरंगाबाद सह नाशिक जळगाव भागात पाऊस कोसळत असून,कारंजा-मानोरा-वाशिम व मराठवाड्यात त्याची तिव्रता जास्त असून,नदी-नाले धरणे तुडूंब झाल्याने काही ठिकाणी धरणातून पाण्याचा विसर्ग केल्या जात आहे.त्यामुळे शेतकरी-शेत मजूर-ग्रामस्थ-प्रवाशी व वाहनचालकांनी नदी-नाले-पांदण रस्ते,पुल आणि पाण्याने वहाणाऱ्या अनोळखी रस्त्यावरून आपला स्वतःचा जीव धोक्यात टाकून जाऊ नये.तसेच गुरेढोरे व चारचाकी किंवा दुचाकी वाहनं टाकू नये.अशा सूचना वेळोवळी सुज्ञ वक्ती,जिल्हाधिकारी, तहसिलदार,शासन, आपात्कालिन पथके तसेच हवामान अभ्यासक गोपाल गावंडे आणि महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेकडून अध्यक्ष तथा आदर्श समाजसेवक संजय कडोळे हे वेळोवेळी करीत असतांना देखील काही आबाल वृद्ध व तरुण ऐकायलाच तयार नसल्याचा प्रत्यय येत आहे.काल यवतमाळ जिल्ह्यात पुस नदीवर घडलेल्या एका घटनेत शेकडो ग्रामस्थ व शेतकरी सांगत असतांनाही एका तरुणाने पूराचे पाणी वहात असतांनाही अट्टाहास करीत पुल ओलांडण्याचा प्रयत्न केला व अखेर पुराच्या लोंढ्याने तो तरुण वाहून गेला.व त्याने नाहक आपला जीव गमवीला.तर दुसऱ्या एका कारंजा तालुक्यातील घटनेत, कारंजा जयपूर रोडवरील नाल्याच्या एका पुलावरून जाण्याच्या प्रयत्नात आजोबा यांना वाचविण्यात जयपूर येथील युवकांना यश आले आहे. केवळ दैव बलवत्तर म्हणूनच हे आजोबा वाचले आहेत.परंतु शेतकरी-ग्रामस्थ व प्रवाशी यांनी नदी नाल्याला आलेल्या पुरातून बाहेर जाण्याचे धाडस किंवा अट्टाहास करणे अंगलट येवून जीवनाचा अंत करणे होय.असे समाजसेवक संजय कडोळे यांनी म्हटले आहे. अशा अनेक घटना गेल्या दोन तिन दिवसात गावोगावी घडलेल्या आहेत.त्याच प्रमाणे सद्यस्थितीत संपूर्ण मराठवाड्यात अति मुसळधार पावसाने प्रचंड हाहाकार उडालेला असून, कारंजा मानोरा वाशिम जिल्ह्यासह मराठवाड्यातील अनेक शहरे,गाववाडे,मनुष्य वस्त्या आणि शेतातील पिके पाण्याखाली गेले आहेत. शेतकऱ्याच्या शेतपिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे. शिवाय अचूक हवामान अंदाज देणारे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक गोपाल गावंडे यांच्या अंदाजानुसार, परतीचा पाऊस लांबला असून आणखी काही दिवस पावसाचा मुक्काम असणार आहे.संपूर्ण सप्टेंबर महिन्यात,जिल्हे,भाग बदलवीत कमी जास्त प्रमाणात पाऊस होणार असून पुढील 48 तास सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दि.03 सप्टेंबर 2024 ; दि 11 व 12 सप्टेंबर 2024 रोजी ढगांच्या प्रचंड गडगडाटासह आणि विजाच्या लखलखाटात अतिमुसळधार ढगफुटी सदृश्य जास्त प्रमाणात पाऊस होणार आहे. तसेच यंदा गौरीपूजन व श्री गणेशोत्सवात पाऊस असल्यामुळे श्री गणेश मंडळांनी श्री गणेशाची स्थापना सभागृहातच करावी.किंवा श्री गणेशाचे मंडप टिनपत्र्याच्या शेडमध्ये वा ताडपत्री टाकून करण्याचे आवाहन करण्यात येत असून,चालू वर्षी अनेक भागात ओल्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवल्यामुळे श्री गणेश मंडळांनी डी जे साऊंड सारख्या पाश्च्यात्य संस्कृतीवर बहिष्कार टाकून, आपले सण-उत्सव महाराष्ट्रियन पारंपारिक लोककला,वाद्य व संस्कृतीने आनंदोत्साहात साजरे करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे, आदर्श समाज सेवक यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here