prabodhini news logo
Home ठळक बातम्या सुप्रसिद्ध साहित्यीका माला मेश्राम साहित्य रत्न पुरस्काराने सन्मानित

सुप्रसिद्ध साहित्यीका माला मेश्राम साहित्य रत्न पुरस्काराने सन्मानित

0
132

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार महाराष्ट्र राज्य २०२४ साठी नेरुळ नवी मुंबई येथील सुप्रसिद्ध साहित्यिका मा.माला आनंद मेश्राम यांना साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. बाळासाहेब पुरस्कार आणि डॉ. जी. डी.हस्ते प्रदान करण्यात आला.याप्रसंगी प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार २०२४ च्या समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. बाळासाहेब तोरसकर, ज्येष्ठ साहित्यिक मुंबई, उद्घाटक ख.र. माळवे (महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला सांस्कृतिक महोत्सव समिती) स्वागताध्यक्ष प्रा. नागेश हुलावळे (अध्यक्ष वर्ल्ड व्हिजन संस्था मुंबई) प्रमुख पाहुणे डॉ. जी. डी. यादव (अध्यक्ष राष्ट्रीय विज्ञान संस्था) डॉ.डेरिक एंजल्स (नासा शास्त्रज्ञ), डॉ. सुकृत खांडेकर (दैनिक प्रहार संपादक) श्री प्रमोद महाडिक नॅशनल लायब्ररी आणि डॉ. नान्सी अल्यूकर्स इत्यादी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत २५ ऑगस्ट २०२४ ला नॅशनल लायब्ररी वांद्रे येथे सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन प्रमोद सूर्यवंशी, रमेश पाटील, योगेश हरणे यांनी केले होते.
संपूर्ण महाराष्ट्रातून सर्व क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
कवयित्री माला मेश्राम यांचा “ओंजळीतील फुले ” हा काव्यसंग्रह प्रकाशित झालेले असून त्यांना सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रात आजवर अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहे.सध्या त्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला साहित्यिक विचारमंच ,महाराष्ट्र या समूहाच्या उपाध्यक्षा आहेत.त्यांनी सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रात नावलौकिक मिळविला आहे.त्या व्यवसायाने गृहिणी असून सुरुवातीपासूनच त्यांना या क्षेत्रात आवड आहे.अतिशय साधा स्वभाव आणि सर्वांना समजून घेणारे ,गरजू आणि गरीब लोकांना मदत करणारे एक व्यक्तीमत्व म्हणून त्यांची परिसरात ओळख आहे.
या पुरस्काराबद्दल नरेंद्र पवार मुंबई ,प्रा. हंसराज रंगारी मुंबई, संदीप पाटील,समाधान दिनकर लोणकर हिंगोली,प्रमोद सूर्यवंशी, योगिता कोठेकर, सुचित्रा कुंचमवार, वर्षा फटकाळे, प्रा. नानाजी रामटेके गडचिरोली, कल्पना टेंभूर्णीकर नागपूर, योगिता पाखाले, योगेश गोतारणे, वैशाली पाखाले तसेच त्याच्या चाहत्या वर्गांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here