सुभाष दरेकर जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर – आज श्रीगोंद्यात अनोख्या पद्धतीने दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला गेल्या आठवड्यात अनेक दहीहंडी उत्सव साजरे करण्यात आले त्या दहीहंडी मुळे अनेक पालकांना आपल्या पुढच्या पिढीची काळजी वाटु लागली परंतु समाजातील तरुण पिढी वेसणापासुन दुर व्हायला हवी यासाठी काॅग्रेस नेते घन:शाम आण्णा शेलार यांनी एक अनोख्या पद्धतीने ह भ प इंदोरीकर महाराजांच्या समाजप्रबोधन पर किर्तनाने विचारांची दहीहंडी फोडली यावेळी सौ मीनाताई दिलीप गाडे यांच्या यकॄत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया साठी मदत फेरी काढून जमा रक्कम त्यांना मदत म्हणुन दिली तसेच तालुक्यातील एमपिसी विद्यार्थ्यांना मदत म्हणुन ए पी जी अब्दुल कलाम अभ्यासिका व विठ्ठलराव कापसे वाचणालय या दोन स्पर्धा परीक्षा अभ्यासिका यांना पुस्तकांची मदत केली.
आपल्या समाज प्रबोधन किर्तनातुन इंदुलकर महाराज नी तरुण पिढी वेसणाधीन कडे न वळता सुसंस्कृत घडावी म्हणून घन:शाम आण्णा शेलार हे नेहमीच प्रयत्नशील असतात असे गौरवोद्गार काढले तसेच अनेक लोक हे धर्माच्या नावाखाली राजकारण करतात हे कुठे तरी थांबले पाहिजेत व तरुणांनी स्वा:ताचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न करावे अशा अनेक विषयांवर प्रबोधन केले अशा प्रकारचा दहीहंडीचा कार्यक्रम श्रीगोद्यात प्रथम च आयोजित केल्याबद्दल अनेक स्तरातुन काॅग्रेस नेते घन:शाम शेलार यांचे कौतुक होत आहे.

