कोल्हापूर कलानगरीमध्ये उत्सवकाळात होणाऱ्या ट्राॅली शो व अश्लील नृत्य करणाऱ्या मुलींच्या वर (उदा. इन्स्टाग्रामवर व फेसबुक) बंदी करण्याची मागणी

0
405

रेणूताई पोवार कोल्हापूर महिला जिल्हा प्रतिनिधी – कोल्हापूर जिल्हा हा कलेचे माहेर घर आहे तसेच करविरचा वारसा राजेश्री श्री. छत्रपती शाहु महाराज यांनी देखील कलेला पूर्णपणे सन्मान देऊन आज पर्यंत कोल्हापूर ला कलेचे माहेर घर म्हणतात गेल्या काही वर्षांपासून बाहेर गावातून आलेल्या डान्सर मुली अश्लील चाळे तसेच अश्लील अदा खाणाखुणा यांचे व्हिडिओ फेसबुक, इंस्टाग्राम यांसारख्या विविध व्हिडिओ जाहिरात करतात तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील मंडळ सुध्दा डान्सर मुली आणतात, तर ते अश्लील होऊ नये यासाठी कोल्हापूर आखिल भारतीय कलाकार ऐकता महासंघ यांच्या वत्तीने कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक सो यांच्या कडे अशा अश्लील चाळे होणाऱ्या बंदीसाठि तक्रार निवेदन देण्यात आले काहिच दिवसांत गणेशाचे आगमन होत आहे अशा या पवित्र सणांमध्ये कोल्हापूर जिल्हामधे अनेक मंडळ ट्राॅली यांच्या नावावर अश्लील नृत्यु अश्लील हावभाव करुन लोकांना भुरळ पाडत आहेत अशी अनेक तरुण पिढी व्यसनाधीन होतं आहेत तरी पारंपरिक सणाला यात्रा,जत्रा ,उरुस ,व इंस्टाग्राम वर फेसबुक वर आपली पारंपरिक कला न दाखवता अश्लील नृत्य हावभाव करुन कोल्हापूर कलानगरी नाव बदनाम करत आहे तरी या गोष्टी चा विचार करुन प्रत्येक गावोगावी म़ंडाळाच्या ठिकाणी अशा डान्सर मुलीना बंदी आणावी यामुळे आपल्या कलानगरीला न्याय मिळालाच पाहिजे स्वच्छ सुंदर हि कला नगरी पारंपरिक राहिली पाहिजे जीवन हे कलेचे साधन आहे याचं साधनाला कोल्हापूर जिल्हा अधिक्षक सो यांनी मनःपुर्वक लक्ष घालुन कला नगरीला ऐक सन्मान द्यावा तसेच बंदी न केल्यास आखिल भारतीय कलाकार ऐकता महासंघटना तीव्र आंदोलन केल्या शिवाय राहणार नाही असे त्यांनी आपल्या लेखनही द्वारे कळविण्यात आले ह्या अपेक्षांचे
कलाकार महिला जिल्हा अध्यक्षा सौ शोभा पाटिल, सायली सावंत, अरुणा जाधव, महेश कदम अनिल पाटील, हेमंत जोशी रघुनाथ चौगुले, श्रुती जोशी ,पूजा या सर्व कलाकारांची उपस्थिती लावुन अश्लील डान्स वर बंदी आणण्यासाठि यांच्या कडुन तक्रार निवेदन देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here