
तृप्ती चिद्रावार कार्यकारी संपादिका प्रबोधिनी न्युज – लोणावळा दि. 10 एप्रिल 25 महायुती मध्ये मित्र पक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाला सत्तेत वाटा मिळत नाही. अनेक वेळा चर्चा होऊनही पक्षाला गृहीत धरले जाते. तेव्हा स्वतःच्या बळावर निवडून येण्याची तयारी असली पाहिजे असे उदगार केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ना. रामदास आठवले यांनी लोणावळा येथील हिरकणी रिसॉर्ट येथे पक्षाच्या राज्यव्यापी अभ्यास शिबिरात काढले. अध्यक्षस्थानी राजाभाऊ सरवदे होते.
अभ्यास शिबिरात ऍड. दिलिप काकडे मार्गदर्शन करतांना म्हणाले की, मित्र पक्षांची कितीही अवेहेलना झाली तरी मित्रपक्ष प्रस्तापित पक्षा विरुद्ध जात नाहीत हे प्रस्तापित पक्षाला माहित असते. आपण दबाव गट निर्माण केला पाहिजे असे काकडे म्हणाले. उद्योजक संतोष कांबळे म्हणाले की, SC/ST उद्योजक घडविणारी( डिकी) हीं एकमेव संस्था आहे. आम्ही नोकरीं देणारे उद्योजक निर्माण करत आहोत. मंदार भारदे म्हणाले की, कार्यकर्त्यांनी भाषण कला अवगत केली पाहिजे. आपला इतिहास आपण नोंदहून ठेवला पाहिजे.

सहित्यिक शरणकुमार लिंबाळे म्हणाले की, पॅन्थर सुरु केली पाहिजे. नविन पिढी तयार झाली पाहिजे. पँथरला युवक आघाडी म्हणून मान्यता दिली पाहिजे. रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस अविनाश महातेकर म्हणाले की, पॅन्थर बरखास्ती नंतर आपण रिपब्लिकन संकल्पना घेतली आहे. रिपब्लिकन पक्षांकडे विशिष्ट जाती जमातीचा पक्ष म्हणून पहिले जाते. आपण वेगवेगळ्या समूहातील कार्यकर्त्यांना बरोबर घेतले पाहिजे. अभ्यास शिबिराचे निमंत्रक सूर्यकांत वाघमारे म्हणाले की, समाजात उद्योजक निर्माण झाले पाहिजे आम्ही ज्या ट्रक मधून प्रवास करायचो त्या ट्रॅकचे मालक झालो आहोत.
कार्यक्रमाचे प्रास्तविक कार्याध्यक्ष बाबुराव कदम यांनी केले तर सूत्रसंचालन प्रदेश सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी केले. शिबिराला राष्ट्रीय सचिव दयाल बहादुरे, महिला अध्यक्षा आशा लांडगे, आण्णासाहेब रोकडे, श्रीकांत भालेराव, अरुण पाठारे आदी. मान्यवर उपस्थित होते.














