prabodhini news logo
Home चंद्रपूर बियाणीनगर हाउसिंग सोसायटी,तुकुम चंद्रपूर तर्फे तान्हापोळा उत्सवात साजरा

बियाणीनगर हाउसिंग सोसायटी,तुकुम चंद्रपूर तर्फे तान्हापोळा उत्सवात साजरा

0
258


सुविद्या बांबोडे जिल्हा संपादक चंद्रपूर- बियाणीनगर हाउसिंग सोसायटी,तुकुम चंद्रपूर तर्फे दिनांक 03.09.2024 रोजी तान्हापोळा उत्सवाचे आयोजन बियाणीनगर मधील हनुमान मंदिर परिसरातील बगीच्यामध्ये करण्यात आले. तान्हापोळा उत्सवामध्ये 21 स्पर्धकांनी भाग घेतला. स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून हरीभाऊ बोनगीरवार, कविता जावळे व संजय जुनोनकर यांनी नंदी सजावट, वेशभूषा व म्हणी (स्लोगन) ईत्यादी बाबत परिक्षण करुन निकाल दिला. आरुष अविनाश लेनगुरे प्रथम, ओम विनोद हेडाऊ, व्दितीय आणि कुमारी धरा अभिजीत कामडे,तृतीय पुरस्काराचे मानकरी ठरले. उर्वरित सहभागी सर्वांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आले. पुरस्काराचे वितरण मा. चंदन पाटील, अतिरिक्त आयुक्त, चंद्रपूर शहर महा नगर पालिका यांचे हस्ते वितरीत करण्यात आले. कार्यक्रमांसाठी उपस्थित सर्व बालगोपालांना व त्यांच्या पालकांना मा. चंदन पाटील, अतिरिक्त आयुक्त, राम काळे, सेवानिवृत्त शिक्षक व अभय गजभिये आणि बियाणीनगर हाऊसिंग सोसायटीच्या वतीने फळे व खाऊ वाटप करण्यात आले. तान्हापोळा उत्सवाकरिता बियाणी नगर कॉलनी मधील शेतकऱ्याच्या वेशभूषेत मुलांनी शेतीचे महत्व, शेतपिकाला भाव, जय जवान जय किसान, पशुधनाचे महत्व, शेतकऱ्यांच्या समस्या, स्वछ भारत सुंदर भारत विषयावर फलक झळकाविले तर मुलींनी बदलापूर व कोलकत्याच्या घटनेवरून ‘बेटी पढी पर बची नही’ असे मुली व महिलांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात फलक दाखवून देशातील चालू घडामोडीवर सर्वांचे लक्ष वेधून घेतले, मा. चंदन पाटील, अतिरिक्त आयुक्त मनपा चंद्रपूर यांनी सर्व बालगोपाळांना तान्ह्या पोळ्याच्या शुभेच्छा दिल्या. बियानीनगर येथील रहिवाश्यानी स्तुत्य उपक्रम राबविल्या बद्दल बियानीनगर हाऊसिंग सोसायटी चे आभार मानले. बालगोपालांनी व त्यांच्या पालकांनी उत्साहाने सहभाग घेतला. शांतारामजी चौखे, अध्यक्ष, बियाणीनगर हाऊसिंग सोसायटी आणि त्यांचे कार्यकारीणी मंडळातील सहकाऱ्यांनी तान्हापोळा उत्सवाचे नियोजन करुन कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here