prabodhini news logo
Home अहेरी आदिवासी समाज हेच खऱ्या अर्थाने निसर्ग पूजक:अजित पवार

आदिवासी समाज हेच खऱ्या अर्थाने निसर्ग पूजक:अजित पवार

0
143

आलापल्ली येथे राकॉची जनसन्मान यात्रा संपन्न

तिरुमलेश कंबलवार अहेरी प्रतिनिधी – अहेरी/आलापल्ली : गडचिरोली हा आदिवासीबहुल जिल्हा असून येथील आदिवासी समाज निसर्गाशी नातं कायम ठेवून आहे.निसर्गाचं संवरक्षण आणि संवर्धन करणारा हा माझं आदिवासी समाज असून निसर्गाच्या नियमाप्रमाणे आदिवासी बांधव आपल जीवन जगतात. निसर्गाचा समतोल राखण्याचा काम माझ्या आदिवासी बांधवांनीच केला आहे.त्यामुळे आदिवासी समाज हेच खऱ्या अर्थाने निसर्ग पूजक असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

अहेरी विधानसभा क्षेत्रातील आलापल्ली येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (६ सप्टेंबर) रोजी ‘जनसन्मान यात्रा’ काढण्यात आली. त्यानंतर क्रीडा संकुलच्या मैदानात आयोजित सभेत ते बोलत होते.यावेळी मंचावर राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम, राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, माजी जि प उपाध्यक्ष रवींद्र बाबा आत्राम, राकॉ चे ज्येष्ठ नेते बबलू हकीम, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य नाना नाकाडे,सिनेट सदस्य तनुश्री आत्राम,हर्षवर्धन बाबा आत्राम,रामेश्वर बाबा आत्राम, माजी बांधकाम सभापती युधिष्ठिर विश्वास,सरपंच शंकर मेश्राम, अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, युनूस शेख, सारिका गडपल्लीवार, पुष्पा अलोन,रमेश मारगोनवार,सतीश भोगे,मधुकर कोलूरी, सुरेंद्र अलोने,तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना अजित पवार यांनी महायुतीच्या माध्यमातून राज्यात विविध लोककल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.त्यातून सर्व घटकांना न्याय देण्याचा काम केलं आहे. विशेष म्हणजे राज्यातील माझ्या आदिवासी बांधवांना न्याय मिळावं यासाठी मी अर्थसंकल्प सादर करत असताना तब्बल १५ हजार ३६० कोटींची तरतूद केली.आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणल्याशिवाय महाराष्ट्र राज्याचा सर्वांगीण विकास होऊच शकत नाही असे देखील त्यांनी स्पष्ट केले.
गडचिरोली जिल्ह्यात लवकरच मेडिकल कॉलेज उभारलं जाणार असून त्याबाबतीतील मंजुरी राज्य सरकारनं दिली आहे. याशिवाय त्यासाठीची आर्थिक तरतूद देखील करून ठेवली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील होतकरू विद्यार्थ्यांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न साकार होणार आहे. याबरोबरच आरोग्य समस्या सोडवण्यास मदत मिळणार आहे. आम्ही आरोग्याची सेवा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविण्याकरिता ५ लाख रुपयांपर्यंतचा विमा प्रत्येक कुटुंबाला दिला आहे. त्याचप्रमाणे लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनी ही चार्मोशी तालुक्यातील कोनसरी येथे आम्ही आणली, त्या माध्यमातून मोठ्या संख्येनं रोजगार उपलब्ध झाले आहेत.आम्ही गडचिरोलीत विमानतळ उभारणार आहोत. रेल्वे सेवा उपलब्ध करून देणार आहोत. विकास सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्रातील इतर भागांच्या तुलनेत या क्षेत्रात ३० टक्के अधिक गुंतवणूक केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. तर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा लाभ मोठ्या प्रमाणावर राज्यभरातील माझ्या मायमाऊली भगिनींना होत आहे, मुलींना मोफत शिक्षण, विद्यार्थ्यांना प्रशिक्षण भत्ता, तीन गॅस सिलेंडर मोफत यासारख्या सवलती आम्ही देऊ केल्या आहेत. शेतकऱ्यांची वीज बिल आम्ही माफ केली आहे. मौलाना आझाद विकास महामंडळाची मर्यादा ६० कोटींची होती ती हजार कोटींची केली. यासारख्या प्रभावी योजना अनेक वर्षे सुरू राहाव्यात यासाठी महायुतीला साथ द्या असे आवाहन त्यांनी केले.

मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी आपल्या मार्गदशनात अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयात पद निर्मिती करून त्या रुग्णालयाचा लोकार्पण लवकर करावं,जवळ जवळ २० वर्षांपासून आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या ग्राम रोजगार सेवकांना न्याय देण्यासाठी निधीची तरतूद करावी एवढेच नव्हेतर तर गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरिता आपली तिजोरी उघडा, माझे आदिवासी बांधव सदैव आपल्या पाठीशी राहतील अशी ग्वाही दिली.पक्ष फोडणारे आता घर फोडायला निघाले आहेत.विधानसभा निवडणुकीत माझ्याच विरोधात माझ्या घरून उमेदवार देण्याचा शरद पवार गटाचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे माझ्या नावाचा वापर करून इतर कोणीही अलग राजकारण करत असतील तर त्यांना धडा शिकवा असे आवाहन देखील उपस्थित जनतेला मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.

दरम्यान पोलीस उप मुख्यालय प्राणहिता येथे अजित पवार यांचे आगमन होताच मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. प्राणहिता पोलीस मुख्यालय पासून नागेपल्ली येथील रेडी कॉम्प्लेक्स पर्यंत बाईक रॅलीने त्यांचे स्वागत करण्यात आले.नागेपल्ली येथे लाडक्या बहिणींनी उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम व राष्ट्रवादीचे नेते सुरज चव्हाण यांना राखी बांधली. यावेळी अजित पवार यांनी लाडक्या बहिणींची संवाद साधले. त्यानंतर वि.दा.सावरकर चौकातून आदिवासी बांधवांनी पारंपारिक पद्धतीने रेला नृत्य करत मान्यवरांना कार्यक्रमस्थळी आणले.

उबाटा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाला केला जय महाराष्ट्र
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रियाज शेख यांनी आपल्या पक्षातील विविध तालुका प्रतिनिधी, शहर प्रतिनिधी, नगरसेवक व कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश घेतला. यावेळी ना. अजित पवार व मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी पक्षाचा दुपट्टा गळ्यात टाकत पुष्पगुच्छ देऊन उभाटा गटातील सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here