परभणी प्रतिनिधी- दयावान सरकार महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा. संदीप निकुंभ, मराठवाडा अध्यक्ष मा.संजय गायकवाड, परभणी जिल्हा अध्यक्ष मा. रघुवीर सिंग भाई टाक व प्रसिद्ध मराठी – हिंदी चित्रपट सिने अभिनेत्री मा.अल्का आठल्य- कुबल यांच्या सुचने नुसार दयावान सरकार परभणी जिल्हा युवा कार्यकरणी युवा जिल्हा अध्यक्ष अमित भालेराव, कला रत्न संच परभणी मधुकर कांबळे व अभिनेत्री मोहिनी पटेल यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी शहरातील वसमत रोड येथील स्नेह महिला वृद्धाश्रम येथे दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी निराधार वृद्ध महिलांना अन्नदान स्वरूपात वेज बिर्याणी, जिलेबी चे वाटप करून सामाजिक उपक्रम राबविण्यात आला आहें.
तसेच समई नृत्यकार मा. मधुकर कांबळे यांनी व अभिनेत्री मोहिनीताई पटेल यांनी गीत गाऊन व नृत्य सादर करून उपस्थित्यांचे मनोरंजन करून मने जिंकली. हा सामाजिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजक मोहिनी पटेल मुंबई अभिनेत्री, कलावंत मधुकर कांबळे, जयश्री कांबळे, रेखा पंडित, युवा नेते व्यंकटेश कदम, दिग्दर्शक चित्रपट व त्यांचा संच, दयावान सरकार महाराष्ट्र राज्य चे परभणी जिल्हा अध्यक्ष रघुवीर सिंग भाई टाक जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद अंभोरे, युवा जिल्हा अध्यक्ष अमित भालेराव, युवा जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा शिंदे पाटील, मधुकर कांबळे व त्यांचा कलासंच, महिला जिल्हाध्यक्षा उषाताई पंचांगे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख शेख अझर, शहर उपाध्यक्ष कैलास भाऊ पतंगे, भिमाकोरेगाव मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष संदीप वायवळ, पत्रकार विंग चे शहर उपाध्यक्ष प्रशांत वाटूरे, कलारत्न संच चे कलावंत, दयावान सरकार महाराष्ट्र राज्य चे पदाधिकारी आदींनी परिश्रम घेतले.

