सेलु प्रतिनिधी- येथील श्रीराम प्रतिष्ठान आयोजित डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन व आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ (ता.६) वार शुक्रवार रोजी विद्याविहार संकुल येथे पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात द्विप्रज्वलन व डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमा पुजनाने झाली. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ संजय रोडगे, आणि डॉ. ऋतुराज साडेगावकर मा. डॉ. राजेंद्र गात, ज्येष्ठ पत्रकार मा. नारायण पाटील, मा. दिलीप डासाळकर, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी तथा घटक संस्थेचे प्राचार्य आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अशोक बोडखे यानी व्यक्त केले. याप्रसंगी संस्थेच्या वतीने देण्यात येणारा परभणी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जि.प.प्रा. शा वाई येथील मा. कुंभार अशोक रामराव यांना आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक आल्याबद्दल श्रीमती मुगुट कर अनिता बालाजीराव यांचा गौरव करण्यात आला.वरील सर्व पुरस्काराचे वितरण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे व सचिव डॉ. सविता रोडगे यांच्या हस्ते करण्यात आले.
`गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात परब्रह्म तस्मैः श्री गुरुवेः नमः।` भारतीय संस्कृतीत आईनंतर सर्वांत महत्त्वाचे स्थान आहे ते गुरुला. आई जशी मुलांवर संस्कार करते, तसा गुरु हा मुलांना घडवण्याचे, त्यांना सक्षम करण्याचे काम गुरु करतो. जीवनाला दिशा देण्यात आणि आपली जडणघडण करण्यात गुरुचा वाटा खूप मोठा असतो. त्यामुळे शिक्षक दिनाला भारतीय संस्कृतीत अधिक महत्त्व आहे. त्यामुळे शिक्षकांनी एक आदर्श विद्यार्थी घडविण्याचे काम तुम्ही लोक करत आहात. नाविन्यपूर्ण व कृतीयुक्त शिक्षण पद्धतीचा वापर करून विद्यार्थ्यांना शिकविले पाहिजे. शिक्षकांनी सर्वप्रथम स्वतः मध्ये विद्यार्थी प्रतिअमुलाग्र बदल करणे अपेक्षित आहे. संस्थेच्या वतीने आज आपण आदर्श शिक्षक पुरस्कार व उपक्रमशील शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे त्यांचे विषेश अभिनंदन व आभार संस्थेतील सर्व शिक्षक कर्मचारी यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या असे बोलतांना डॉ. संजय रोडगे म्हणाले.
सुखदेव घुले, कुंभार अशोक, डॉ. ऋतुराज साडेगावकर आदींनी मनोगत व्यक्त केले. याकार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदिप आकात, कल्पना भाबट यांनी केले व आभार दिगंबर टाके यांनी मानले.

