prabodhini news logo
Home घुग्घुस भावी आमदार सुरेश मल्हारी पाईकराव यांचे सत्कार

भावी आमदार सुरेश मल्हारी पाईकराव यांचे सत्कार

0
110

घुग्घुस प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – आज दिनांक – : 14 सप्टेंबर 2024 रोजी गणपती बाप्पाच्या आगमनापासून तर महाप्रसादाचा कार्यक्रमा पर्यंत मतदारसंघातील महत्वाच्या मंडळांच्या ठिकाणी भावी आमदार सुरेश मल्हारी पाईकराव यांच्या भेटी दिल्याचे पाहायला मिळत आहे .

चंद्रपूर – विधानसभा निवडणुकीचे भावी आमदार सुरेश मल्हारी पाईकराव प्रत्यक्षरीत्या आपला प्रचार सुरु केला आहे. निवडणुका तोंडावर असल्याने मतदारसंघात स्वत:ची ताकद दाखवण्याची कोणतेही संधी पाईकराव हे सोडत नसल्याचे दिसून येत आहे . शनिवारी झालेल्या गणपती बाप्पाचा महाप्रसादचा कार्यक्रमात भावी आमदार सुरेश पाईकराव यांनी सुद्धा विविध ठिकाणी भेटी दिलेल्या पहायला मिळत आहे.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर प्रत्येक मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सुरेश पाईकराव हे कोणत्याही ठिकाणी पहायला मिळत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून भावी आमदार सुरेश मल्हारी पाईकराव यांनी भेटीगाठी सुरु केल्या आहेत. तर इच्छूक उमेदवार पाईकराव आपल्या मतदारसंघातील, धर्मिक कार्यक्रम असो किंवा अन्य ठिकाणी न चुकता हजेरी लावताना दिसत आहे. गणपती बाप्पाच्या आगमनापासून तर महाप्रसादचा कार्यक्रमा पर्यंत मतदारसंघातील मंडळांच्या ठिकाणी भावी आमदार सुरेश मल्हारी पाईकराव यांनी भेटी दिल्याचे पाहायला मिळाले.

विशेष म्हणजे पठाणपुरा व्यायाम शाळा गणेश मंडळ चंद्रपूर गणपती बाप्पाचा महाप्रसादाचा कार्यक्रमाला मंडळाचा पदाधिकाऱ्यांनी भावी आमदार सुरेश मल्हारी पाईकराव यांना निमंत्रित करुन शॉल व पुष्पगुच्छ देऊन भावी आमदार सुरेश पाईकराव यांच्या सत्कार करून त्यांना आपणच यावेळेस 2024 चे आमदार होणार अशा देखील मंडळा तर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.

सुरेश मल्हारी पाईकराव यांनी मंडळाचे व सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले व आपल्या सर्वांची साथ वडीलधारी माणसांचा व चंद्रपूर जिल्हय़ातील सर्व नागरिकांचा आशिर्वाद माझ्या पाठीशी असाच सदैव राहो अशा मनोकामना केल्या .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here