परळी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – वंचित बहुजन आघाडी परळी शहर व तालुक्याच्या बैठकीचे आज आयोजन करण्यात आले असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्ध प्रमुख बाळासाहेब जगतकर यांनी दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की वंचित बहुजन आघाडी परळीच्या पदाधिकाऱ्यांना कळवण्यात येते की काही दिवसांवर विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत. त्या अनुषंगाने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी सबंध महाराष्ट्रभर आरक्षण यात्रा काढून आरक्षण वाद्यांना एकत्र करण्याचे काम केले. साहेबांची ही आरक्षण यात्रा बीड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यामध्ये गेली. फक्त परळी तालुका सोडून म्हणून श्रद्धेय साहेबांशी चर्चा केल्यानंतर साहेबांनी परळी मतदारसंघातील मतदारांशी संवाद साधण्यासाठी परळीच्या पदाधिकाऱ्यांनी संवाद यात्रा काढण्याची सूचना केली आहे साहेबांची सूचना सरसावंधे मानुन आपल्या परळी मतदारसंघात संपर्क अभियान चालू करावयाचे आहे त्याच्या नियोजनासाठी आज दिनांक 16/09/2024 सोमवार रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाध्यक्ष शैलेश भाऊ कांबळे, जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिजामाता उद्यान परळी वै. येथे जिल्हा पदाधिकारी, तालुका व शहर पदाधिकारी यांनी व्यक्तिगत फोनची वाट न पाहता हा मेसेज पाहिल्याबरोबर सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन ता. अध्यक्ष गौतम साळवे, ता. युवा अध्यक्ष राजेश सरवदे, शहराध्यक्ष गफारशा खान, शहर युवा अध्यक्ष प्रेम जगतकर यांनी केले असल्याची माहिती ही वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्ध प्रमुख बाळासाहेब जगतकर यांनी दिली आहे.

