दिपाली पाटील जिल्हा उपसंपादक, चंद्रपूर – दिनांक 15/09/2024 वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर विधानसभा तर्फे स्थानिक सुभाष लॉन बल्लारपूर येथे आगामी 2024 विधानसभा निर्धार मेळावा हजारो लोकांच्या उपस्थित यशस्वीपणे पार पडला.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने मा.डॉ.निलेशदादा विश्वकर्मा प्रदेश अध्यक्ष वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र उपस्थित होते त्यासोबत कार्यक्रमाच्या अध्यक्ष मा. प्रा. सोमाजी गोंडाने जिल्हाध्यक्ष पश्चिम चंद्रपूर, तसेच प्रमुख पाहुणे मा.कुशलभाऊ मेश्राम प्रदेश सदस्य,मा. राजेश बोरकर जिल्हा प्रभारी चंद्रपूर मा. कविताताई गौरकार जिल्हाध्यक्ष महिला आघाडी, मा. शुभम मंडपे जिल्हा अध्यक्ष युवा आघाडी, ऍड.अक्षय लोहकरे जिल्हा महासचिव, अजय गावंडे जिल्हा संघटक,लोकेश झाडे सम्यक जिल्हा अध्यक्ष, मधुकर उराडे जिल्हा महासचिव, सत्यभामा भाले जिल्हा सल्लागार, ऍड .रितेश मारकवार तालुकाध्यक्ष मुल, अविनाश वाळके तालुका अध्यक्ष पोभुर्णा, नम्रता साव तालुका अध्यक्ष बल्लारपूर, रेखा पागडे शहराध्यक्ष बल्लारपूर, गायत्री रामटेके शहराध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा, इत्यादी मान्यवर उपस्थित होते,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.ओम रायपुरे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.ऍड रितेश मारकवार यांनी केले त्यानंतर माननीय निलेश दादा यांनी आपल्या मार्गदर्शन करताना कार्यकर्त्यांना संबोधित केले की बल्लारपूर विधानसभा हे आपली अस्तित्वाची लढाई असून हे आपणास तन-मन धनाने कामाला लागावे तसेच SC ST OBC आरक्षण वाचवण्याकरिता श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे.
या कार्यक्रमाचे नियोजन वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर मुल पोभूर्ण तर्फे करण्यात आला असून या कार्यक्रमाला यशस्वीरित्या करण्याकरिता अभिलाष चूनारकर तालुका अध्यक्ष वंचित बहुजन युवा आघाडी, रेखाताई पागडे शहराध्यक्ष बल्लारपूर, अश्विन शेंडे जिल्हा सदस्य, सिद्धांत पुणेकर जिल्हा उपाध्यक्ष युवा आघाडी, सुदेश शिंगाडे जिल्हा सदस्य, शुभम नागापुरे शहराध्यक्ष, प्रज्ञा नमनकर तालुका महासचिव, सुप्रिया चंदनखेडे, गौतम रामटेके, मदन रामटेके,रवि तेलसे, अतुल वाडके, श्याम गेडाम,शारदा कोर्से, जया डंबारे, नंदाताई देशभ्रतार,रत्नामाला निरंजने, स्वीटी लोंढे, वत्सला तेलंग, सुशीला नगराळे प्रशांत सातकर ,प्रियकेश शिंगाडे, प्रभुदास देवगडे, दूरेश तेलंग, धम्मदीप वाळके, दिलीप गेडाम,ओम रायपुरे, यशवंत देवगडे,वंदना पुणेकर, माया आमटे, जोशीला वाघाडे, तसेच मूल पोभुर्णा येथील पदाधिकारी व निष्ठावंत कार्यकर्ते यांनी दिवस-रात्र मेहनत घेतली व या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली.
या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर महापुरुषाच्या प्रतिमेला पुष्पहार घालून दीप प्रज्वलित करण्यात आली.व येणाऱ्या विधानसभा निवडणुकी मोठ्या ताकतीने लढू व भावी आमदार हे बल्लारपूर विधानसभेच्या वंचित बहुजन आघाडी चा असेल व बाळासाहेब आंबेडकर यांच्या हात मजबूत करून असे प्रतिपादन मा. निलेश दादा विश्वकर्मा तसेच कुशल मेश्राम ,सोमाजी गोंडाने, हितेश मळावी ,कविता गोरकर ,यांनी आपल्या मार्गदर्शनातून कार्यकर्त्यांना सांगितले तसेच आभार प्रदर्शन अविनाश वाळके यांनी केला.या कार्यक्रमाला मूल व पोभुर्णा बल्लारपूर येथील प्रचंड जनसमुदाय उपस्थित होते.

