परळी शहरातील भीम नगर जगतकर गल्ली येथील शंकर साळवे ते सखाराम जगतकर यांच्या घरापर्यंत पाईपलाईनच्या कामाची सुरुवात

0
110

परळी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – परळी शहरातील भीम नगर जगतकर कधी येथील शंकर साळवे येथे सखाराम जगतकर यांच्या घरापर्यंतची पाईपलाईनच्या कामास सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्ध प्रमुख बालासाहेब जगतकर यांनी दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की परळी शहरातील भीम नगर येथील विविध कामासाठी दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परळी नगरपालिकेसमोर उपोषण केले असता येथील प्रमुख मागणी शंकर साळवे ते सखाराम जगतकर यांच्या घरापर्यंत ची पाईपलाईन करून नागरिकांना पाणी देण्यात यावे या मागणीची दखल घेऊन परळी नगरपालिकेने काम चालू केले असून लवकरच येथील नागरिकांना पाणी उपलब्ध होऊन येथील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मिटणार असल्यामुळे येथील . श्रीमती शांताबाई जगतकर कुमार जगतकर कबीर गोखले सुशाला जगतकर सुनील आदोडे सुनील कांबळे गायकवाड लक्ष्मी गायकवाड समाधान जगतकर यांच्यासह इतर नागरिकांतून बालासाहेब जगतकर यांचे कौतुक करण्यात येत असून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले अशा प्रकारची माहिती वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्ध प्रमुख बाळासाहेब जगतकर यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here