सुविद्या बांबोडे जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर – आधुनिक भारताचे विश्वकर्मा म्हणून गणना केल्या जाणारे जागतिक कीर्तीचे अभियंता सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त देशभर साजरा केला जाणारा अभियंता दिन, ग्रॅज्युएट इंजिनिअर असोसिएशन तर्फे चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या ऊर्जानगर वसाहतीतील स्नेहबंध सभागृह येथे उत्साहात साजरा झाला.
या कार्यक्रमाला सन्माननीय मुख्य अतिथी म्हणून रामदेव बाबा इंजिनीरिंग कॉलेजचे रजिस्ट्रार असलेले प्राध्यापक व प्रसिद्ध अभियंते डॉ. संजय बोडखे यांची उपस्थिती होती, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता मा. गिरीश कुमारवार साहेब उपस्थित होते. याबरोबरच उपमुख्य अभियंता मा. शाम राठोड, अनिल पूनसे , नितीन रोकडे,डॉ.भूषण शिंदे,अमित बनकर, मुख्य महाव्यवस्थापक (विवले) बाहुबली दोडल, अधीक्षक अभियंता रवी चौधरी, सराग साहेब, उमाप साहेब, जीईएचे केंद्रीय सचिव सुयोग झुटे, केंद्रीय अध्यक्ष रवींद्र जांगीलवार , उपाध्यक्ष गोपाल चोपडे,राज्यसचिव नवल दामले, विभागीय सचिव मकरंद परदेशी उपस्थित होते.याबरोबरच संघटनेचे चंद्रपूर,कोराडी,खापरखेडा,नाशिक,भुसावळ येथील प्रतिनिधी तसेच चंद्रपूर विद्युत केंद्रातील अभियंते, ट्रेनी इंजिनियर्स,असे जवळपास सव्वा तीनशे अधिकारी उपस्थित होते.
ग्रॅज्युएट इंजिनिअर असोसिएशनचे मकरंद परदेशी यांनी संघटनेची कार्यपद्धती,नवीन संकल्पना यांच्याबद्दल माहिती दिली तसेच पगारवाढीतील विशेष योगदानाबद्दल केंद्रीय पदाधिकाऱ्यांचे विशेषतः सुयोग झुटे व सुप्रीत शिंदे यांचे संघटनेतर्फे आभार मानले.
चंद्रपूर विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता कुमारवार साहेब यांनी महानिर्मिती समोरील आगामी काळात असलेली आव्हाने, उद्दिष्टे साध्य करण्याकरिता उपस्थित अभियंत्यांना मार्गदर्शन केले तसेच अभियंत्यांनी रोजच्या कामाबरोबरच नवीन तंत्रज्ञान शिकावे असे प्रतिपादन त्यांनी या क्षणी केले.
संघटनेचे केंद्रीय सचिव सुयोग झुटे यांनी पारंपारिक व अपरंपारिक ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रांमधील महत्त्वपूर्ण बदल,भविष्यातील त्यांची काळानुरूप गरज,त्यातील आर्थिक बाबी याबरोबरच वीज क्षेत्रातील विविध आव्हाने व त्याबद्दल संघटनेची भविष्यातील उद्दिष्टे याबद्दल माहिती दिली.
गुरुपाल गायधने यांनी कार्यक्रमाचे मुख्य अतिथी डॉ. संजय बोडखे यांचा थोडक्यात परिचय करून दिला.यावेळी बोलताना कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी मा.बोडखे यांनी समाजातील इंजिनियरचे महत्व, वीजनिर्मिती क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान तसेच आगामी काळातील इंटरनेट ऑफ थिंग्स ,आर्टिफिशल इंटेलिजन्स, बिग डेटा अनालिटिक्स या नवीन विषयांवर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाच्या क्षणी यावर्षी निवृत्त होणारे व संघटनेत भरीव कामगिरी करून महत्त्वपूर्ण योगदान देणारे मधुसूदन भूमकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला, याबरोबरच पदोन्नती मिळालेल्या अभियंत्यांचा यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजयसिंह राठोड, प्रतीक खोकले, शिरीष परिहार, रवींद्र पुसम, मनोज शेखावत, राहुल असावा, जयंत पारखी, गजानन गुरव, संदीप पचारे, विशाल जामकर,रोशन लोहे,सुदीप गुठे व इतर पदाधिकारी यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमाची रूपरेषा व सूत्रसंचलन स्वराज आमले व अंकिता सिंग यांनी सांभाळली, तर आभार प्रदर्शन अबुल हयात सामसी यांनी केले. राष्ट्रगीत व स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

