
शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
धुळे जिल्हा प्रतिनिधी सतिष पवार (९५२७७९९३०४) धुळे- संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर विशाल खान्देशचे नेते म्हणून ठसा उमटविणारे आणि अक्कलपाडा प्रकल्पाचे जनक म्हणून ज्यांचे नाव घेतले जाते ते माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील यांनी वृध्दापकाळाने वयाच्या 84 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्र आणि संपूर्ण खान्देशावर शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर शनिवार दि.28 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वा. धुळे शहरातील देवपूर येथील एसएसव्हीपीएस महाविद्यालयाच्या मैदानावर शासकीय इतमामात अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत. याबाबत महाराष्ट्र शासनाच्यावतीने धुळे जिल्हा प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत.














