चक्रधर मेश्राम यांनी लिहिलेला चारोळी आणि कवितांचा संग्रह
नागपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दिनांक : – २७/९/ २०२४:- – मराठी भाषेतील श्रेष्ठ आणि प्रसिद्ध कवींच्या साहित्याची ओळख नवीन पिढीला प्रेरणादायक ठरावी. अनेकविध विषयांवरील साहित्य प्रकाराला चालना देण्यासाठी भारतात पहिले कवितेचे गांव साकारण्यात आले. त्याठिकाणी आपणही वसावं, तिथं एक घर असावं असे मनापासून वाटायला लागले, त्यामुळे चक्रधर मेश्राम यांनी १२१८ चारोळ्या आणि कविता रचण्याचा संकल्प करुन त्या संग्रहाचे प्रकाशन करण्याचा निश्चय केला आहे. कवी चक्रधर मेश्राम यांनी लिहिलेल्या चारोळ्या, कविता या विविध विषयांवर असुन प्रथम आवृत्तीत ७५८० प्रती छापल्या जाणार आहेत. इतकेच न नव्हे तर फक्त दोन महिन्यांत ९९ लाख वाचकांना वेगवेगळ्या प्रसार माध्यमांतुन वाचायला मिळणार आहेत. सामाजिक चळवळीत काम करणारे साहित्यिक, कवी चक्रधर मेश्राम यांनी लिहिलेल्या १२१८ चारोळ्यां.. आणि कवितांचा संग्रह पुणे, नागपूर , नाशिक, औरंगाबाद आणि मुंबई येथील वेगवेगळ्या प्रकाशकांकडुन प्रकाशित करण्यात येणार आहे.. प्रत्येक पृष्ठ हे चित्रित राहाणार असुन या संग्रहाची किंमतही वाचकांना परवडणारी राहाणार आहे.
या चारोळी , कविता संग्रहाच्या प्रत्येक पानावर विविधांगी चित्रण राहाणार असुन वास्तविकतेवर रचल्या जाणाऱ्या चारोळ्यां .. कविता प्रबोधनात्मकही राहाणार आहेत.
या चक्रधर मेश्राम यांच्या स्वलीखित संग्रहात सामाजिक , धार्मिक , आर्थिक , राजकीय , सांस्कृतिक , नैसर्गिक शैक्षणिक , यांसारख्या अनेक विषयांवर रचना केली आहे. जिवनाच्या वाटेवरील , अविस्मरणीय प्रवास , प्रेम आणि विश्वास, धोकेबाज, स्वार्थासाठी काही..पण ? , मतलबी दुनिया , लग्नानंतरही धोका?? आठवणीतील …ती., मनाचा… मनाशी संवाद , पहिल्या भेटीनंतर… , आता दुरावलेला सहवास , यांसारख्या अनेकविध विषयांवरील असलेल्या चारोळ्या आणि कविता वाचकांसाठी मनोरंजनात्मक , हृदयस्पर्शी आहेत.घर वसावं आपलं …कवितेच्या उभादांडावर या चारोळी कविता संग्रहाची प्रस्तावना प्रा. एम. आनंद हे लिहीणार असुन यात अनेक मान्यवरांचे शुभेच्छा संदेश राहाणार आहेत. घर असावं आपलं, कवितेच्या उभादांडावर या संग्रहात ” मग … धोका कशाला , ओठ गुलाबी धोक्याचे , हिरवळ वाटली…पण , क्षणभरच का ? , तिरस्कार नको , आता .. तरी , जप जोडलेल्या नात्याला , पशुसारखी जगु नको., झिजत नाही …पण , माणुसकीने जग , सवयीचा बळी का ?, परिवानी दिसली पण …? , बेरोजगारीचा भस्मासुर , सहवास तुझा , आजार हा कशाचा ? , काम करुन पहा, रेती चोरांना आशिर्वाद ? , हातभट्टी पोटासाठी , छापा टाकला कशासाठी ? , … आणि डोकेदुखी ठरली, पुरस्कार कशाला , पडणारच होती…बायपास , जखम , पोटासाठी ? , देवाच्या नावावर , या कवितांचा समावेश आहे. तसेच न्यायव्यवस्था, सामाजिक विकास आणि शासन व्यवस्था विषयांवर प्रकाश टाकणाऱ्या कवितांचा समावेश करण्यात आलेला आहे.

