prabodhini news logo
Home आर्थिक राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या कडून बल्लारपूर येथील कॅन्सरग्रस्त महीलेला वैद्यकीय...

राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या कडून बल्लारपूर येथील कॅन्सरग्रस्त महीलेला वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत

0
132

रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी – ब्रम्हपूरी तालुक्यातील बल्लारपुर माल येथील रहिवासी असलेल्या सितकुराबाई श्रीहरी चौधरी वय 55 वर्ष ह्या मागील वर्षभरापासून कॅन्सर या आजाराने ग्रस्त आहेत. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. मात्र त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने वैद्यकीय उपचार घेतांना त्यांना आर्थिक अडचण निर्माण झाली होती. व त्यांचे पती श्रीहरी चौधरी हे मागील 2 महीन्यांपुर्वी कॅन्सर आजाराने मरण पावले आहेत.
सदरची माहीती बल्लारपूर माल येथील ग्राम काॅंग्रेस कमेटीच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.विजय वडेट्टीवार यांना कळवताच त्यांनी क्षणाचाही विचार न करता आपल्या स्वतः कडून सदर महीलेच्या वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत पाठवली.
सदरची आर्थिक मदत देतांना जनसंपर्क अधिकारी सुधीर पंदीलवार, उपसरपंच मनोज कोटगले, युवक काँग्रेसचे प्रफुल ठिकरे, तंमुस अध्यक्ष जसुजी मोरांडे, सुरज मोरांडे, भोलानाथ कोटगले, टिकाराम मोहुर्ले, कुसुंबाजी दीवटे, एकनाथ दिवटे, राहुल जेंगठे यांसह ग्राम काॅंग्रेस कमेटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here