prabodhini news logo
Home चंद्रपूर एस.आर.एम. कॉलेज ऑफ सोशल वर्क, पडोली आणि संकल्प संस्था चंद्रपूर यांच्या संयुक्त...

एस.आर.एम. कॉलेज ऑफ सोशल वर्क, पडोली आणि संकल्प संस्था चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती समुपदेशन शिबिराचे आयोजन.

0
140

कपिल मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर – चंद्रपूर येथील इंदिरानगर परिसरातील नागरिकांना व्यसनापासून दूर कसे राहता येईल याकरिता एस. आर. एम. कॉलेज ऑफ सोशल वर्क, पडोली चंद्रपूर आणि “संकल्प” संस्था चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने समाजकार्य महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. जयश्री कापसे यांच्या नियंत्रणाखाली आणि पर्यवेक्षिका डॉ. प्रगती नरखेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली “व्यसनमुक्ती समुपदेशन शिबिर” हा कार्यक्रम पार पडला. गांधी जयंती सप्ताह अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला समुदायातील वृद्ध व शाळकरी विद्यार्थी उपस्थित होते. साधारणतः 90 पेक्षा जास्त लोकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ. सिमला गाजर्लावार यांनी शाळकरी विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर राहण्याचे आव्हान केले. प्रमुख मार्गदर्शक विनोद नन्नावरे यांनी उपस्थित लोकांसोबत व्यसनमुक्ती बाबत माहिती दिली. तर सीमा मेश्राम यांनी व्यसनाधीनता ही वैयक्तिक समस्या नसून कौटुंबिक जबाबदारी तसेच सामाजिक समस्या आहे आणि त्याचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांना व समुदायातील इतर लोकांनाही समजावून सांगितले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजीव गांधी कनिष्ठ महाविद्यालय बंगाली कॅम्प, चंद्रपूर तसेच स्व. बापूराव वानखेडे विद्यालय, संजय नगर, चंद्रपूर येथील शिक्षक शिक्षक वृंदांनी आणि एस.आर.एम. कॉलेज ऑफ सोशल वर्क पडोली चंद्रपूरचे विद्यार्थी कुंदन खोब्रागडे, अभिषेक भोयर, नयन आत्राम, उमेश ढोणे, मोनिका कुंभारे, प्रांजली कोरांगे, मोनिका दोडके, नूतन दोडके, अस्मिता दोडके यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here